अजित पवारांचे धाकटे सुपुत्रांचे बारामतीमध्ये विशेष लक्ष; जय पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या ११ शाखांचे उद्घाटन, वाचा सविस्तर

    बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लक्ष घालण्यास सुरुवात केली असून, गुरुवारी (दि १) बारामती शहरात राषट्रवादी युवक काॅंग्रेसच्या ११ शाखांचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. बारामती शहरातील जळोची,तांदुळवाडी,रुइ,खंडोबानगर,जामदार रोड,एकतानगर,वसंतनगर,जगताप मळा,सिध्देश्वर गल्ली, येथील राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या शाखांचे उदघाटन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भुमिका विकासाची आहे.त्याचसाठी त्यांनी निर्णायक भुमिका घेतली.

    बारामतीच्या परीपुर्ण विकासासाठी त्यांना पाठींबा देण्याची गरज जय पवार यांनी व्यक्त केली.तसेच शहराध्यक्ष जय पाटील आणि शहर कार्यकर्ते यांचे संघटन कार्य काैतुकास्पद असल्याचे गाैरवोदगार जय पवार यांनी काढले. यावेळी खंडोबानगर येथे जय पवार यांनी एका हॉटेलमध्ये चहाचा आनंद घेत बारामतीकरांशी संवाद साधला. या दौऱ्याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील म्हणाले ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर संपुर्ण राज्याची जबाबदारी आहे.त्यातून देखील अजितदादा बारामतीला शक्य तेवढा अधिक वेळ देतात.

    आज जय पवार यांच्या दाैर्यामुळे कार्यकर्तेयांच्यात उत्साह दिसून आला.भविष्यात त्यांनी युवकांच्या संघटन बांधणीत बारामतीला अधिक वेळ देणार असल्याचे सांगितले आहे. दाैऱ्याच्या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव ,युवकचे अध्यक्ष अविनाश बांदल आदी उपस्थित होते.