कुडाळमधील ब्राम्हणदेव मंदिर येथे हायमास्टचे लोकार्पण, आमदार वैभव नाईक यांची मुख्य उपस्थिती

वॉर्ड क्र. १५ मध्ये स्थानिक नगरसेवक उदय मांजरेकर यांनी मागील दोन वर्षाच्या काळात अनेक नागरी सुविधा स्थानिक नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

    कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ खालची कुंभारवाडी ब्राह्मण मंदिर जत्रोत्सवानिमित्त नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नाने ब्राम्हणदेव मंदिर येथे हायमास्टचे लोकार्पण कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले.

    यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, ब्राह्मण देव मित्रमंडळ अध्यक्ष शेखर कुंभार, दादा कुंभार, संदीप कुंभार, सुधीर मांजरेकर, किरण मांजरेकर, अतुल माणगावकर, अरुण माणगावकर, सुरेश कुंभार, गोपीनाथ कुंभार, महेश कुंभार, ऍड. महादेव कुंभार, नाना कुंभार, अनंत खटावकर, राजन कुंभार, दाजी कुंभार, बाळू कुंभार, रामदास कुंभार, प्रथमेश मांजरेकर, यश मांजरेकर, रितेश मांजरेकर, गोट्या पंडित, रामदास पंडित, दशरथ कुंभार, निलेश कुंभार, अमर कुंभार, गोट्या कुंभार, अनिल कुंभार, महादेव कुडाळकर, बंड्या नांदवडेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

    वॉर्ड क्र. १५ मध्ये स्थानिक नगरसेवक उदय मांजरेकर यांनी मागील दोन वर्षाच्या काळात अनेक नागरी सुविधा स्थानिक नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा, विहिरी, रस्ते, वीज पुरवठा, सांडपाणी, हायमास्ट् दिवे या सुविधा देण्यात आल्यात. तसेच निराधार आणि दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा पेन्शन योजना राबविण्यात आली आहे. निराधार महिलांसाठी सुद्धा वॉर्ड १५ चे नगरसेवक उदय मांजरेकर यांनी शासकीय मदत मिळवून दिली आहे. याबाबत खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी वेळोवेळी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला आहे.