कणकवली निर्भय बनो सभा कार्यालयाचे उद्घाटन; कणकवलीत ‘निर्भय बनो’ ची २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सभा

    कणकवली : ‘निर्भय बनो’ ही चळवळ गेली ६ महिने सुरु झाली आहे.या सभांमध्ये विश्वंभर चौधरी आणि ऍड. असिम सरोदे हे मार्गदर्शन करतात. देशातील प्रत्येक जण भीतीच्या छायेखाली जगत आहेत. या सर्वांना आपणाला निर्भय बनवायचे आहे. भारताची राज्य घटना आणि लोकशाही धोक्यात आली आहे. देशात घटनेची पायमल्ली होत चालली आहे. इडी सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करुन नेत्यांच्या चौकश्या लावल्या जातात. एखाद्या पक्षात आल्यानंतर वॉशिंग पावडरने स्वच्छता होऊन त्यांना मंत्रीपद दिली जातात, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत निर्भय बनो चळवळीचे समन्वयक सतीश लळीत यांनी व्यक्त केले.

    कणकवली येथील निर्भय बनो यांच्या सभा कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी ॲड. किशोर वरक, हार्दिक सचिन कदम, जाफर याकुब शेख, सौ. उज्वला विजय येळाविकर, नामदेव मठकर, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, आम आदमी पक्ष जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, पुरुषोत्तम कदम, निसार अहमद शेख, विजय शेट्टी, विलास हरी गुडेकर, अजित कानशिडे, सिमंतीनी मयेकर, डॉ. श्रीकांत सावंत, ॲड. प्रसाद करंदीकर, ॲड. आशिष लोके, सतीश लळीत, विनायक (बाळू) मेस्त्री, संदेश मयेकर, निसार काझी आदी मान्यवर उपस्थित होते.

    देशात क्रांती ही सर्वसामन्य माणसाने घडवलेली आहे. हा देशाचा इतिहास आहे. ही एक चळवळ होत असताना कोणताही राजकीय अजेंठा आमचा नाही. काही देशांमध्ये लोकशाही नसल्याने व्यवस्था धोक्यात आलेली आहे. त्यामुळे लोकांनी मत देताना विचार करून दिले पाहिजे. निर्भय बनो ला राज्यात अतिशय उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोकणातील जनता बुद्धिजीवी आहे, काय चांगलं आणि काय वाईट हे समजत आहे. ‘निर्भय बनो ‘सभा होत असतात, स्थानिक समिती कडे देणग्या घेतल्या जातात, त्यातून सभेचा खर्च होतो. लोक सहभागातून ही चळवळ उभी राहत आहे. त्याचा खर्च सभेनंतर दिला जातो, असे श्री. लळीत यांनी सांगितले.

    देशातील भय युक्त वातावरण झाले आहे, ते भयमुक्त होण्यासाठी या सभा आहेत. लोकशाही साठी हा एक संदेश आहे. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षांच्या विरोधात नाही. ईडी, सीबीआय वापरुन लोकशाही धोक्यात आणली जात आहे. भाजपा जरी राजकीय पक्ष असला तरी त्यांनी राज्य घटनेच्या नियामानुसार काम करावे. लोकशाही धोक्यात आणू नये, असे विचारवंतांचे मत आहे. ज्या वक्त्यांची भाषणे होतात, ही राजकीय नसतात, आमचा विरोध कोणाला नाही. कुठल्याही नेत्यांविरोधात आमची भूमिका नाही, असेही श्री.लळीत यांनी सांगितले.

    देशातील लोकशाही, राज्यघटना, न्याय आणि स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. ते वाचवण्यासाठी कृतिशील नागरिकांची भूमिका निर्भय बनो च्या माध्यमातून मांडली जात आहे. देशात वाढती महागाई,शासकीय संस्थांचे खासगीकरण, महिलांवरील अत्याचार, ईडी, सीबीआय चा गैरवापर, ढासळलेली अर्थव्यवस्था, धार्मिक ध्रुवीकरण, सामाजिक सलोखा भंग होत आहेत.त्या साठी कणकवली येथ निर्भय बनो सभा कणकवली प्रांत कार्यालयासमोर २८ जानेवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या सभेला डॉ.विश्वभर चौधरी आणि ऍड. असिम सरोदे हे मार्गदर्शन करणार असल्याचे ऍड. किशोर वरक यांनी सांगितले.