तुळजाभवानी मंदिरात खंडोबा नवरात्रौत्सवाची घटस्थापना  

तिर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील उपदेवता असलेल्या श्री मल्हारी मार्तंड खंडोबा मंदिरात रविवार दि. १० रोजी दुपारी १२ वाजता विधीवत येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली.

    तुळजापूर : तिर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील उपदेवता असलेल्या श्री मल्हारी मार्तंड खंडोबा मंदिरात रविवार दि. १० रोजी दुपारी १२ वाजता विधीवत येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली. रविवार दि. १० रोजी सकाळी श्री खंडोबा मुर्तीस अभिषेक करण्यात आल्यानंतर श्री मल्हार मार्तंड खंडोबा देवतास वस्त्रलंकार घालण्यात आले. यानंतर ‘आई राजा उदो उदो सदानंदी’चा ‘उदो उदो येळकोट येळकोट जय मल्हार’ जयघोषात विधीवत घटस्थापना  करण्यात आली. यानंतर श्री खंडोबा नवरात्रौत्सवास आरंभ झाला.
    यावेळी महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, श्री खंडोबाचे पुजारी श्रीकांत गणपत वाघे, देवीचे पाळीचे पुजारी विशाल सोंजी, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे व्यवस्थापक  सोमनाथ माळी, अमरराजे कदम,  विपीन शिंदे, नारायण वाघे, गणपतराव वाघे, औदुंबर वाघे, संकेत वाघे, बालाजी वाघे, अजित वाघे, सागर वाघे, तिरूपती वाघे, बालाप्रसाद वाघे, दादा वाघे, सुनिल काकडे व समस्त भक्तगण उपस्थित होते.

    शहरातील मंगळवार पेठ, जिजामाता नगर येथील खंडोबा मंदीरात भक्तांनी गर्दी केली होती. या नवरात्रौत्सवाची  सांगता सोमवार दि. १८ रोजी चंपाषष्ठी दिनी घटोत्थापन (घट उठवणे) विधीने होणार आहे.

    तिर्थक्षेञ  तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मंदीरात जेजुरी, बाळ, पाली येथील श्रीखंडोबाचे स्थान मानलेल्या श्रीतुळजाभवानी मंदीरातील उपदेवता असलेल्या श्रीमल्हारीमार्तंड खंडोबा देवस्थान आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस नित्योपचार पुजा करण्यात येणार आहे. दैनंदिन  महाअलंकारपुजा मांडण्यात येणार आहेत, तरी श्रीखंडोबा नवराञोत्सवात भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खंडोबा पुजारी श्रीकांत वाघे यांच्याससह वाघे पुजारी मंडळीनी केले आहे.