कोल्हापूर विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; शिवरायांसह अनेकांची तैलचित्रं ठरतायेत आकर्षण

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाच्या अनुषंगाने दर्शनी भागात बांधण्यात आलेल्या टर्मिनल इमारतीचे  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

  कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाच्या अनुषंगाने दर्शनी भागात बांधण्यात आलेल्या टर्मिनल इमारतीचे  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  उद्योग पर्यटनाला चालना देण्यासाठी कोल्हापूर विमानतळाची विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्या अंतर्गत कोल्हापूर विमानतळावर नवीन टर्मिनस इमारत भव्य दिव्य दगडी स्वरूपात उभारण्यात आली आहे .या इमारतीला कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला साजेशी असे दर्शनी रूप देण्यात आले आहे. यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्यात आणखीन भर पडली आहे. विमानतळाच्या मुख्य प्रवासी कक्षात छत्रपती शिवरायांच्या राजदरबाराचे भव्य असे पहिले चित्र प्रवासी दालनात संपूर्ण भिंतीवरच रेखाटण्यात आले आहे. यासह छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका रणरागिनी ताराराणी, यांची तैलचित्रे विमान तळावर अत्यंत खूबिनी वापरण्यात आले आहे. या इमारतीत कोल्हापूरच्या निसर्ग सौंदर्याचे अद्भुत दर्शन घडविले आहे कोल्हापुरात आगमन होणाऱ्या प्रवाशांना करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री ज्योतिबा याचे दर्शन होणार आहे त्याचबरोबर बॅग्ज क्लोज मध्ये अंबाबाई आणि जोतिबाच्या भव्य प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत.  यासह रंकाळा, पन्हाळा ,खिद्रापूरचे मंदिर अशा कोल्हापूरच्या पर्यटनाचे दर्शन घडवणाऱ्या भव्य कलाकृतीने प्रवाशांचे स्वागत होणार आहे.
  आधुनिक सुविधा सह सज्ज असलेल्या या इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिराज्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन दारी उद्घाटन करण्यात आले .हा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी भव्य स्क्रीन लावण्यात आलेल्या होत्या. तसेच टर्मिनसला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हवाई सेवा विस्तारीकरणासाठी केलेल्या प्रयत्नाला एक प्रकारे यश आले असून त्याचे समाधान कोल्हापूर वासियांच्या चेहऱ्यावर आज दिसून येत होते. हा अद्भुतपूर्व सोहळा डोळ्यात टिपण्यासाठी नागरिकांनी  मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
  विमानतळावर टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळयानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत काही वेळ चर्चा केली. शिवसेनेतील नेतेमंडळीची काही मिनिटाची ही भेट राजकीय चर्चेची ठरली.
  यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे आदी उपस्थित होते.
  कोल्हापूर विमानतळ येथील टर्मिनल इमारतीच्या लोकार्पण सोहळयासाठी मुख्यमंत्री शिंदेचे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास  व्यासपीठावर आगमन झाले. तोपर्यंत इतर नेत्यांची भाषणे झाली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाला सुरूवात  झाली. दरम्यान उत्तरप्रदेश येथील आझमगढ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळयाला सुरुवात झाली. यामुळे मुख्यमंत्रयांनी दोन मिनिटात आपले भाषण आटोपले, कोल्हापूर विमानतळाच्या विकासकामांना शुभेच्छा दिल्या. जवळपास पंचवीस मिनिटे पंतप्रधान मोदी यांचे ऑनलाइन भाषण झाले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे यांनी विमानतळ प्राधिकरणच्या अधिकाऱ्यासोबत टर्मिनल इमारतीची पाहणी केली. इमारत पाहणी सुरु असताना पालकमंत्री मुश्रीफ हे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
   मुख्यमंत्री व अनय नेत्यांनी टर्मिनलची नूतन इमारत पाहिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी, आमदार प्रकाश आबिटकर कुठे आहेत ? अशी विचारणा केली. टर्मिनल इमारतीमध्येच एका बाजूला मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार आबिटकर, खासदार मंडलिक, खासदार माने, आमदार यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर या साऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी काही वेळ चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री पुढील कार्यक्रमासाठी विमानाने रवाना झाले.