चांदणी चौकातील नवा उड्डाणपूलाचे लाेकार्पण ; केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आलेला चांदणी चौकातील नवा उड्डाणपूल आज दि. १२ राेजी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. चांदणी चौक शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. मात्र अरूंद रस्त्यामुळे चांदणी चौकात वाहतुकीची कोंडी सातत्याने होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला हाेता.

  पुणे : वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आलेला चांदणी चौकातील नवा उड्डाणपूल आज दि. १२ राेजी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. चांदणी चौक शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. मात्र अरूंद रस्त्यामुळे चांदणी चौकात वाहतुकीची कोंडी सातत्याने होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला हाेता.

  चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. दोन ऑक्टोबर रोजी जुना पूल पाडण्यात आल्यानंतर नव्या उड्डाणपुलासाठी काम सुरू करण्यात आले. त्यानंतर अडचणींवर मात करत उड्डाणपूलचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, न्यायालयीन प्रकरणे आणि स्थानिक अतिक्रमणे आदी अडचणी गतीने कार्यवाही करत दूर करण्यात आल्या. हा नवा उड्डाणपूल ११५ मीटर लांब असून ३६ मीटर रुंदीचा आहे.

  एनडीए, मुळशीकडून येऊन बावधन, पाषाण, वारजे आणि कोथरूडकडे जाणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असून एनडीए, मुळशीकडून येऊन मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका आहेत. मुंबईकडून येऊन बावधन किंवा पाषाणला जाण्यासाठी महामार्गावरील पाषाण जोड रस्त्याने (विवा ईन हॉटेल) जाता येणार आहे. मुंबईकडून येऊन मुळशीकडे जाण्यासाठी कोथरूड भुयारी मार्गाने एनडीए चौक मार्गे वेदविहार, मुळशी, एनडीएला जाता येणार आहे.

  दहा महिन्यात बांधकाम पूर्ण
  तीन स्वतंत्र मार्गिका, सेवा रस्त्यांमुळे मुंबईकडे जाणे यामुळे अधिक सुलभ होणार आहे. या नव्या उड्डाणपुलाला सुशोभीकरणाचा साजही देण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिमेकडील वाहतूक कोंडी सुटण्यास माेठी मदत होणार आहे. अवघ्या दहा महिन्यांच्या विक्रमी काळात उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

  बावधन, पाषाणकडून वारजे, कात्रजकडे जाण्यासाठी पाषाण कनेक्टर रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. कोथरूड ते सातारा, वारजे ही वाहतूक सातारा महामार्गावरील सेवा रस्त्यावरील शृंगेरी मठाजवळून महामार्गाने जाणार आहे. वारजे, साताऱ्याकडून येऊन पाषाण, बावधनकडे जाणाऱ्यांना नवीन उड्डापुलाच्या स्वतंत्र मार्गिकेवरून मुळशी रस्त्याला येता येणार आहे. यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

  वाहतुक कांेडी सुटणार
  पुण्यातील सर्वात चर्चेत असलेल्या चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे आणि रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे येथील वाहतूक कोंडी अखेर सुटणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. पुण्यात चांदणी चौक महत्वाचा आहे. येथून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, पुणे सातारा मार्ग, तसेच कात्रज येथे जाण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. मात्र, या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. यामुळे येथे असणारा जुना पूल हा पाडण्यात आला हाेता. आणि त्या एवजी या ठिकाणी नवीन रस्ते तयार करण्यात आले आहेत.

  रस्त्या येणाऱ्या जागा भूसंपादनासाठी महापालिकेला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली आहे. दरम्यान, येथील वाहतूक कोंडीत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दीड तास अडकून पडले होते. यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानंतर शिंदे यांनी स्वत: याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना हा मार्ग पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर या रस्त्याच्या कामाला वेग आला होता.