म्हसवडमध्ये रस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ; विजय सिन्हा यांची माहिती

म्हसवड शहराला कायम भेडसावत असलेल्या एस.टी. बसस्थानक ते बायपास, स्मशानभुमी या रस्त्याचे भुमीपूजन व डांबरीकरणाचा शुभारंभ आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते शनिवार (दि.१२) रोजी पार पडला असला तरी याच रथमार्गाचे उर्वरीत वडजल ओढा या रस्त्याच्या कामचाही शुभारंभ आ. गोरे यांच्या हस्ते शनिवारी होत असून यासाठी सर्व म्हसवडकर जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांनी केले आहे.

    म्हसवड : म्हसवड शहराला कायम भेडसावत असलेल्या एस.टी. बसस्थानक ते बायपास, स्मशानभुमी या रस्त्याचे भुमीपूजन व डांबरीकरणाचा शुभारंभ आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते शनिवार (दि.१२) रोजी पार पडला असला तरी याच रथमार्गाचे उर्वरीत वडजल ओढा या रस्त्याच्या कामचाही शुभारंभ आ. गोरे यांच्या हस्ते शनिवारी होत असून यासाठी सर्व म्हसवडकर जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांनी केले आहे.

    म्हसवड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव येत्या २४ तारखेला होत आहे, गत शनिवारी म्हसवड शहरात आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते स्मशानभूमी ते बायपास या रस्त्याचे भुमीपूजन करण्यात येऊन प्रत्यक्षात सदर रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात असले तरी सदर रस्त्याच्या भुमीपूजन प्रसंगीच आ. गोरे यांनी म्हसवडकर जनतेला संपुर्ण रथमार्गाचे डांबरीकरण यात्रेपुर्वी करण्याचा शब्द दिला होता त्याप्रमाणे अवघ्या ८ दिवसांतच आ. गोरे यांनी उर्वरीत रस्त्यासाठी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे. त्यामुळेच आ. गोरे यांना शब्द पाळणारा नेता असे सामान्य जनता म्हणत असल्याचेही सिन्हा यांनी सांगत सदर उद्घाटन कार्यक्रमास सर्व म्हसवडकर जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

    आम्ही आलो विकासकामे सुरु झाली…

    म्हसवड पालिकेत आ. जयकुमार गोरे यांच्या विचाराची सत्ता होती तोपर्यंत म्हसवड शहरात विकासाची अक्षरशा गंगा वहात होती, आमच्या सत्ताकाळात म्हसवड शहरात जो काही विकास झाला, त्यामुळे म्हसवड शहराचे विकासाचे एक मॉडल जिल्ह्यात झाले होते, मात्र आम्ही सत्तेतुन पायउतार झालो अन् म्हसवड शहराचा विकासचं थांबला. गत ५ वर्षात विकास म्हणजे काय हेचं येथील जनता विसरुन गेली आहे, त्यामुळे म्हसवड शहराचे थांबलेले विकासचक्र पुन्हा सुरु करण्यासाठी आमचे नेते जयकुमार गोरे यांना पुन्हा म्हसवड शहरात लक्ष घालावे लागले आहे, त्यांनी लक्ष घातले अन् थांबलेले म्हसवडचे विकास चक्र पुन्हा वेगाने धावू लागले आहे, असे ही शेवटी माजी नगराध्यक्ष सिन्हा यांनी सांगितले.