नागपूरातील धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलीवर बापानेच केला अत्याचार

हिंगणा तालुक्यातील जुनी वाणी या गावांमध्ये इयत्ता सातवी शिकत असलेल्या अल्पवयीन बारा वर्षीय मुलीला बापाने आपल्या वासनेची शिकार केले आहे. अल्पवयीन मुलगी तीन ऑगस्ट रोजी शाळेत गेली होती. आरोपी सतीश कुळमते ह्याने शाळेत मुलीला घरी घेऊन आला मुलीची आई मजुरीच्या कामाला शेतात गेले असल्यामुळे दुपारी घरी कोणी नसल्याने या नराधमाने एक ते पाच वाजता दरम्यान मुलीवर दोनदा बलात्कार केला.

    नागपूर – हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जुनेवाणी गावांमध्ये सतीश कुळमते या निर्दयी कुकर्मी बापाने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हिंगणा पोलिसांनी आरोपी सतीश कुळुमते याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध कलम ३७६ आणि पोक्सो कायद्याअंतर्गत कलम गुन्हा दाखल केला आहे.

    हिंगणा तालुक्यातील जुनी वाणी या गावांमध्ये इयत्ता सातवी शिकत असलेल्या अल्पवयीन बारा वर्षीय मुलीला बापाने आपल्या वासनेची शिकार केले आहे. अल्पवयीन मुलगी तीन ऑगस्ट रोजी शाळेत गेली होती. आरोपी सतीश कुळमते ह्याने शाळेत मुलीला घरी घेऊन आला मुलीची आई मजुरीच्या कामाला शेतात गेले असल्यामुळे दुपारी घरी कोणी नसल्याने या नराधमाने एक ते पाच वाजता दरम्यान मुलीवर दोनदा बलात्कार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितलं तर जिवे मारण्याची धमकीही दिली या पूर्वी ही आरोपींने २७ जुलै रोजी अर्ध्या रात्री सर्व झोपले असता मुलीचे तोंड दाबून बलात्कार केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र ३ जुलै रोजी घडलेल्या प्रकारामुळे मुलगी पूर्णपणे हादरली होती. तिने कामावरून आलेल्या आईला घडलेला पूर्ण प्रकार सांगितला. आईने मुलीला घेऊन हिंगणा पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना सर्व आपबीती सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हिंगणा पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.