आमदार निवासस्थानात गैरसोय; अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर…सरकारचे लक्ष नेमकं कुठे आहे?

आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली.

    नागपूर शिंदे-फडणवीस सरकारचे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन हे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशनातील दुसरा व तिसरा दिवस सत्ताधारी व विरोधक यांच्यात विविध मुद्द्यावरुन खडाजंगी झाली. आज अधिवेशनाचा चौथ्या दिवस देखील विरोधक आक्रमक होत असताना,  सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आज अधिवेशनाच्या सुरुवातीला कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणाच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्न विरोधकांनी केला. आज विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) चौथ्या दिवशीही विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत, तर सत्ताधारी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आक्रमक होत आहेत.

    दरम्यान, आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली. दरम्यान पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही, सरकारचे लक्ष नाही सरकारचे लक्ष आहे कुठे? असा सवाल अजित पवार यांनी केला. दरम्यान या घटनेला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

    टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता, त्यानंतर यावर विरोधक आक्रमक होत, सभागृह दणाणून सोडले. व सभात्याग केला. यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्यात हे काय चाललंय आहे? असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली.