आमदार प्रकाश सोळुंके यांच्या अडचणीत वाढ; भाजप नेते अशोक शेजुळ मारहाण प्रकरणी सोळुंकेविरोधात गुन्हा दाखल

या हल्ल्याप्रकरणी आता आमदार प्रकाश सोळुंके हे अडचणीत सापडले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार प्रकाश सोळंके, पत्नी मंगल प्रकाश सोळंके, उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सात जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड : आमदार प्रकाश सोळुंके (mla prakash solanke) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सोळुंके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संस्थांमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे भाजप नेते अशोक शेजुळ (Ashok Shejul) यांच्यावर तीन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी आता आमदार प्रकाश सोळुंके हे अडचणीत सापडले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार प्रकाश सोळंके, पत्नी मंगल प्रकाश सोळंके, उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सात जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके हे बीड (beed) जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. येथील भाजप कार्यकर्ते तथा रमेश आडसकर यांचे विश्वासू अशोक शेजुळ यांच्यावर भरदिवसा सहा हल्लेखोरांनी शहरातील शाहू नगर येथे अडवून रॉडने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा शेजुळ यांच्या फिर्यादीवरून माजलगावचे याप्रकरणी त्यांनी दिलेल्या यादीवरून प्रकाश सोळंकेसह, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके व रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.