एसटी अपघातात वाढ ! केवळ दोन महिन्यातच तब्बल 3 हजाराहून अधिक मृत्यू

मागील काही महिन्यांमध्ये एसटी बसच्या अपघातामध्ये वाढ झाली आहे.

    नागपूर – राज्यातील अंतर्गत वाहतूकीमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र मागील काही महिन्यांमध्ये एसटी बसच्या अपघातामध्ये वाढ झाली आहे. मागच्या तीन वर्षामध्ये प्रवाशांची संख्या देखील तीन पटीने वाढली आहे. मात्र वाढती अपघाताची संख्या देखील चिंताजनक आहे. माहिती अधिकारांतर्गत अपघातांचा तपशील समोर आला आहे.

    महसुलामध्ये विक्रमी वाढ

    १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान ३३ कोटी २० लाख २२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने एसटीला १ हजार ४६३ कोटी ७५ लाख ३१ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४९ कोटी ५५ लाख ४३ हजार प्रवाशांमुळे २ हजार ५३५ कोटी ५४ लाख ३४ हजार, २०२२- २३ मध्ये १५९ कोटी ७९ लाख ९२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने ७ हजार ४१० कोटी २८ लाख ७८ हजार तर २०२३-२४ (फेब्रुवारी २०२४ पर्यंत) १८६ कोटी १२ लाख ७ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने ९ हजार १५६ कोटी २१ लाख ८१ हजार रुपयांचा महसूल एसटीला मिळाला आहे.

    अपघातांमध्ये वाढ

    जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ दरम्यान ६२९ घडलेल्या बस अपघातांमध्ये ७१ मृत्यू झाले. २०२१-२२ मध्ये १ हजार २८१ अपघातांमध्ये १५९ मृत्यू, २०२२-२३ मध्ये ३ हजार १४ अपघातांमध्ये ३४३ मृत्यू झाले. २०२३-२४ (फेब्रुवारी २०२४ पर्यंत) ३ हजार १२१ अपघातांमध्ये ३८० मृत्यू नोंदवले गेल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.