वारकरीही भडकले! अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ही सध्या अटकेत आहे. तिचा अटकपूर्व जामीन देखील रद्द झाला आहे. आता तीच्या अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे. संत तुकाराम महाराजांची ‘तुका म्हणे’ ही स्वाक्षरी असल्याने पोस्टमध्ये तीचा वापर केल्याने केतकीवर गुन्हा दाखल करायची मागणी देहू संस्थानने केली आहे(Increase in the difficulty of actress Ketki Chitale).

    पिंपरी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ही सध्या अटकेत आहे. तिचा अटकपूर्व जामीन देखील रद्द झाला आहे. आता तीच्या अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे. संत तुकाराम महाराजांची ‘तुका म्हणे’ ही स्वाक्षरी असल्याने पोस्टमध्ये तीचा वापर केल्याने केतकीवर गुन्हा दाखल करायची मागणी देहू संस्थानने केली आहे(Increase in the difficulty of actress Ketki Chitale).

    अभिनेत्री केतकी चितळे हिला काल 14 मे रोजी अटक झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिला ठाणे पोलिसांनी अटक केली. आता तीच्या अडचणीत वाढ झाली आहे. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या तुका म्हणे या शब्दांचा वापर केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे पत्र देहू संस्थानने पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिले आहे.

    तिने तुका म्हणे शब्द वापरुन वादग्रस्त लिखाण पोस्ट केले. तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहेत. तुका म्हणे ही त्यांची नाममुद्रा असून त्यांच्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे. तसेच, केवळ तुकाराम महाराज नाही तर कोणत्याच संताचे साहित्य अशा विटंबना करणाऱ्या लिखाणात वापरू नये. त्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी देहू संस्थानची मागणी आहे.

    या प्रकरणातील मुख्य व्यक्ती भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. केतकी चितळे यांनी केलेली पोस्ट मुळची भाजप प्रवक्ते अधिवक्ता विनायक आंबेकर यांची आहे. या प्रकरणी आता वातावरण तापले असून, कळवा ठाणे नंतर इतर ठिकाणीही अनेक गुन्हे दाखल होत आहेत. सध्या या प्रकरणात शरद पवार यांनी आपले मत प्रकट केलेले नाही.