राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत होतीये वाढ; अवघ्या सात महिन्यांत ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

राज्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. वाढते अपघात आणि त्यातून होणारी प्राणहानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून, त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

  मुंबई : राज्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. वाढते अपघात आणि त्यातून होणारी प्राणहानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून, त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. जानेवारी ते जुलै २०१३ या कालावधीत १९,७१९ अपघात झाले असून, या अपघातात ८,९०७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अपघात घटले असून पुण्यात वाढले आहेत.

  गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातात १४६ ने तर मृत्यूंमध्ये ३८५ ने घट झाली आहे, सध्याच्या घडीला राज्यात तीन कोटी ४७ लाख ७३ हजार ६२५ वाहनांची नोंदणी झालेली आहे. देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून, हे अपघात कमी करण्यासाठी आरटीओसह वाहतूक पोलिस विविध योजना राबवीत आहेत. रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतून प्रवासी वाहतूक करणे, वेगाने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसविणे, गाडी चालवताना मोबाइलचा वापर करणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही कारणे आहेत. अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून, त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे.

  मुंबईत ५५१ अपघात

  मुंबईत एकूण ४३ लाखांहून अधिक चाहने आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये ५५१ अपघात झाले असून, या अपघातात १४८ जणांचा मृत्यू झाला. २०२२ च्या तुलनेत अपघातात ५९० नी घट, मृत्यूंमध्ये ६४ तर गंभीर जखमींची संख्या ४९२ ने कमी आहे.

  पुण्यात ७०५ अपघात

  पुण्यात गेल्या ५ वर्षाच्या तुलनेत यंदा अपघात व मृत्यू वाढले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ४९४ अपघातात १८९ लोकांचा मृत्यू झाला तर ३५२ जण जखमी झाले होते. यंदा सात महिन्यात ७०५ अपघातांत २०५ मृत्यू तर ५०२ जण जखमी झाले.