सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन करात वाढ

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन शुल्काच्या वाढीव शुल्कास नियामक मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पर्यटन शुल्कात जवळपास तिपटीने वाढ होणार आहे.

  शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन शुल्काच्या वाढीव शुल्कास नियामक मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पर्यटन शुल्कात जवळपास तिपटीने वाढ होणार आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव नियामक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानुसार हे दर वाढवण्यात आले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यानी दिली.

  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन शुल्कात जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. माणसी ३० रुपये आकारला जाणारा पर्यटन दर आता प्रति पर्यटक १०० रुपये करण्यात आला आहे. त्याचबरोबर १२ वर्षाखालील पर्यटक, गाईड शुल्क, वाहन कर, कॅमेरा शुल्क यातही भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन दर

  तपशील /आधीचे दर /वाढीव दर

  – १२ वर्षा वरील/ ३०/ १००
  – १२ वर्षाखालील/ १५/ ५०
  – गाईड फी /२००/२५०
  – वाहन शुल्क फी/१५०/१५०
  – कॅमेरा शुल्क फी/५०/१००

  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री व्याघ्र राखीव नियामक मंडळाची बैठक पार पडली आहे. त्याचे इतिवृत्त वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडून पाठवण्यात आले आहे. यात पर्यटन शुल्काच्या वाढीव करास नियामक मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार हे दर वाढवण्यात आले आहेत.

  - नंदकुमार नलवडे, वनक्षेत्रपाल सह्याद्री व्याघ्रप्रकल्प