शेतकऱ्यांच्या दुधाला भाव वाढवून द्या : आ. राम सातपुते सभागृहात आक्रमक

नागपूर हिवाळी अधिवेशनात आ राम सातपुते शेतकऱ्यांच्या दूधाला भाव वाढवून मिळावा यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. खासगी दूधसंघांच्या एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खाजगी दूधसंघ शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम करत आहेत.

    अकलुज : नागपूर हिवाळी अधिवेशनात  राम सातपुते शेतकऱ्यांच्या दूधाला भाव वाढवून मिळावा यासाठी क्रमक झालेले पाहायला मिळाले. खासगी दूधसंघांच्या एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत हे. खाजगी दूधसंघ शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम करत हेत. यावर चाप बसला पाहीजे, अशा लुबाडणाऱ्या खाजगी दूधसंघावर कारवाई करा अशी क्रमक मागणी माळशिरसचे  राम सातपुते यांनी ज सभागृहात बोलताना सरकारकडे केली.
    शेतीला जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूध व्यवसायासाठी शेतकरी पहाटे 4 वाजता उठून राबत असतो, जनावरांना लागणारी वैरण णि  पशूखाद्य यांची बेरीज केली णि मिळणाऱ्या दुधाचा भाव पाहिला तर पाण्याच्या बाटलीचासुद्धा भाव जास्त होईल अशी परिस्थिती हे, खाजगी दूधसंघ यामध्ये जबाबदार हेत, त्यांच्या एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून यावर तातडीने मार्ग काढण्याची गरज हे, शेतकरी जर समृद्ध करायचा असेल तर त्याच्या दूधाला रास्त भाव देण्याची गरज हे, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या दूधसंघावर कारवाई करा णि शेतकऱ्यांना दुधाला भाव वाढवून द्या अशी मागणी  राम सातपुते यांनी सभागृहात बोलताना केली.

    शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते परंतु सतत वाढत जाणारे पशुखाद्याचे दर महागत जाणारा चारा आणि दुधाला मिळणारी किंमत याचा ताळमेळ लागत नाही यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था भीक नको पण कुत्र आवरा अशी परिस्थिती दूध उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे मात्र नेमकं याच मुद्द्यावर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी सभागृहाचे लक्ष वेधले याचा मनस्वी आनंद होत आहे सरकारने योग्य न्याय द्यावा हीच अपेक्षा

    -जयसिंगराव कदम ,दूध उत्पादक शेतकरी वेळापूर (शेरी)