Sai Baba's Darshan of Shirdi will be available only if there is online booking; Sai Sansthan's appeal to come to Shirdi only if there is a booking

शिर्डी: साई बाबा यांच्या मंदिरातील भाविकांची दर्शन मर्यादा वाढवण्यात आली आहे. अनलॉकनंतर राज्यातील मंदिरे दर्शनासाठी उघडल्यावर शिर्डीत आतापर्यंत रोज ६ हजार भाविकांना दर्शनाची परवानगी मिळत होती. पण आता रोज १२ हजार भाविक साईंचं दर्शन घेऊ शकणार आहेत. साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन बुकिंग करावं, असं आवाहनही साई संस्थानकडून करण्यात आलं आहे. नाताळमुळे होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.

साई संस्थानकडून हा भाविकांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. साई संस्थानकडून रोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मर्यादा वाढवण्यात आली आहे. मात्र, जास्त गर्दी झाल्यास दर्शन बंद केलं जाणार असल्याचंही संस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर सुट्टीच्या दिवशी शिर्डीमध्ये ऑफलाईन बुकिंग काऊंटर बंद ठेवण्यात येणार आहेत.

साई संस्थानकडून रोज १२ हजार भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे. त्यात 8 हजार भक्तांना ऑनलाईन फ्री पास तर 4 हजार भक्तांना ऑनलाईन पेड पास दिले जाणार आहेत. ३१ डिसेंबरला मंदिर खुलं ठेवायचं की नाही, याबाबत मात्र अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे.