प्रतापगड पायथ्याशी असणाऱ्या अफजल खानाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ

याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सांगितले की, 'अफजल खानची कबर ही २००५ पासून प्रतिबंधित क्षेत्र आहे. तिथे अतिरिक्त पोलीस दलाची भेट, हा नित्याचा एक भाग होता. संवेदनशील ठिकाणांना नियमीत भेट दिली जाते. त्याचअंतर्गत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीला भेट दिली.

    सातारा – खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वादविवाद सुरू आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून औरंगजेबाची कबर पर्यटक व इतर लोकांसाठी बंद करण्यात आली होती. तसेच, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यातच आता खबरदारीचा उपाय म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीवर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

    याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सांगितले की, ‘अफजल खानची कबर ही २००५ पासून प्रतिबंधित क्षेत्र आहे. तिथे अतिरिक्त पोलीस दलाची भेट, हा नित्याचा एक भाग होता. संवेदनशील ठिकाणांना नियमीत भेट दिली जाते. त्याचअंतर्गत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीला भेट दिली.

    ‘अफजल खानाची कबर असलेल्या भागात वातावरण बिघडवण्याचा कट रचला जात असल्याची माहिती नुकतीच पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर परिसराची पाहणी करण्यात आली, असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या वेळी रॅपिड अॅक्शन फोर्सची १०२ बटालियन आणि १५ क्यूआरटी जवान कबर परिसरात उपस्थित होते. त्याचवेळी महाबळेश्वर पोलीस, नवी मुंबई जलद कृती दलाचे जवानही या काळात कबरीभोवती तैनात होते. या पाहणीनंतर महाबळेश्वरमधील विविध समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशीही अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यासोबतच त्यांना सतर्क राहून शांतता राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.