Sharad Pawar, don't lie too much ... Sadabhau will attack Pawar nrvk

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याविषयीचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. शनिवारी सकाळी राज्याच्या पोलिस प्रमुखांना सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याची सूचना दिली असल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले आहे(Increased security for Sadabhau Khot).

    मुंबई : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याविषयीचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. शनिवारी सकाळी राज्याच्या पोलिस प्रमुखांना सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याची सूचना दिली असल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले आहे(Increased security for Sadabhau Khot).

    दरम्यान, पवार कुटुंबापासून आम्हाला धोका आहे, असे खोत यांनी म्हटले होते. त्यावर वळसे पाटील म्हणाले की, सदाभाऊंच्या जीविताला धोका आहे असे वाटत नाही.

    तरीसुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केली आहे, त्यांचे जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिस प्रमुखांना खोत यांची सुरक्षा वाढविण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे ते म्हणाले.