Australia win toss in deciding T20 match
Australia win toss in deciding T20 match

    Ind vs Aus 3rd T20 Live : आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सामना मालिकेतील 3 रा सामना आज गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. तिसऱ्या T20 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. या मालिकेतील हा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना जर भारताने जिंकला तर मालिका विजयाचा मानकरी भारतीय संघ ठरणार आहे. आणि कांगारूंनी हा सामना जिंकला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान शिल्लक राहणार आहे.

    भारतीय संघातील ऋतुराजने आज टीम इंडियाची महत्त्वाची कमान सांभाळत धावसंख्येला आकार दिला. कर्णधार सूर्या 39 धावा करुन आऊट झाला. ऋतुराज गायकवाड यांना धमाकेदार फलंदाजी करी 125 धावा कुटल्या. परंतु त्याची खेळी ही व्यर्थ गेले ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहजरीत्या पार करी पाच विकेट राखून भारतावर विजय मिळवला.

     

    भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (व.), सूर्यकुमार यादव (क), रिंकू सिंग, टिळक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसीध कृष्णा

    ऑस्ट्रेलिया संघ : ट्रॅव्हिस हेड, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (c&wk), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन