महिलेला व्हॉट्सऍपवर पाठविला अश्लील फोटो; सायबर पोलिसांत तक्रार येताच आरोपीला ठोकल्या बेड्या

एका व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर मुलींचे अश्लील फोटो पाठवून महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली. फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिस स्टेशन, अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अमरावती : एका व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर मुलींचे अश्लील फोटो पाठवून महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली. फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिस स्टेशन, अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सायबर पोलिसांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून तांत्रिक पध्दतीने तपास करुन यातील फिर्यादी यांना फोटो पाठविण्याऱ्या आरोपीचा शोध घेऊन यातील शुभम प्रकाश चापके, (वय 25, व्यवसाय, मजुरी, रा. सांगवा बु., ता. दर्यापूर, जि. अमरावती) याचा अमरावती शहरातील विविध ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून शोध घेतला असता अखेर त्याला 11 डिसेंबर रोजी एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.

    सध्या त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला 1 मोबाइल हॅन्डसेट, सिम कार्डसह जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.