फेरीवाल्यांचे ‘अ’ प्रभागावर बेमुदत आंदोलन; रोजगार हिरावल्याने मनपाचा केला निषेध

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ क्षेत्रिय कार्यालयाकडून पिंपरी चौक, शगुन चौक, महाबली चौक, शनी मंदिर अशा विविध ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अन्यायकारक कारवाई करण्यात येत आहे. महाबली चौकामध्ये अनेक वर्षांपासून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले जात आहे. याच्या निषेधार्थ व रोजगाराच्या हक्कासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संत ज्ञानेश्वर चौकातील ‘अ’ प्रभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन आजपासून सुरू केले.

    पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ क्षेत्रिय कार्यालयाकडून पिंपरी चौक, शगुन चौक, महाबली चौक, शनी मंदिर अशा विविध ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अन्यायकारक कारवाई करण्यात येत आहे. महाबली चौकामध्ये अनेक वर्षांपासून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले जात आहे. याच्या निषेधार्थ व रोजगाराच्या हक्कासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संत ज्ञानेश्वर चौकातील ‘अ’ प्रभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन आजपासून सुरू केले.

    नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र होकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, संघटक अनिल बारवकर, किरण साडेकर, विठ्ठल कड, बालाजी लोखंडे,परमेश्वर, सुशेन खरात, प्रदीप कोंगले, सुनंदा चिखले, अनिता वाघ, रेखा लागस, कमल नवगिरे, मनीषा गालफाडे, पूनम बनसोडे, अनिता बोरसे, करण भोसले, पिंटू डोहाळे, अक्षय नवगिरे, अप्पासाहेब जयगुडे, दिनेश भोसले, सुरेश नवगिरे, प्रदीप मुंडे, अनिल मंदीलकर यांचेसह अनेक विक्रेते व पदाधिकारी उपस्थित होते.

    विक्रेत्यावर अन्याय

    नाखाते म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा अपघात घडला की त्यांचे खापर फेरीवाल्यावरती फोडले जाते आहे हे अत्यंत चुकीचे आहे. महाबली चौक व इतर ठिकाणच्या विक्रेत्यावर अन्यायकारक आणि चुकीची कारवाई करून सुमारे पंधरा दिवसापासून त्यांचा व्यवसाय बंद केला हा अधिकार त्यांना कोणी दिला, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार सुरू आहे. आमच्या विक्रेत्यांचे झालेली नुकसानभरपाई देणार कोण? असा प्रश्न त्यानी उपस्थित केला.

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ व फ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत हॉकर झोनच्या ठिकाणी सोयी- सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली आणि अतिक्रमण कारवाई व फेरीवाला व्यवसायामध्ये समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे, अशी मागणी केली त्यांनी त्याचबरोबर महानगरपालिका दहा हजाराच्या कर्जासाठी एकीकडे अर्ज भरून घेते. एकीकडे त्यांचेवर कारवाई करते हा दुटप्पी भूमिका व मोघल सरकाराप्रमाणे महानगरपालिका कारवाई करत आहे. याचा आम्ही तीव्र शब्दांमध्ये निषेध करीत आहोत. प्रशासनाने भूमिका घेऊन सदर विक्रेत्यांचे व्यवसाय सुरू नाही केले तर पुढच्या कालावधीमध्ये बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही नखाते यांनी यावेळी दिला आहे. मंडपात देशभक्तीचे व चळवळीचे गाणे या आवाजात आंदोलन सुरू ठवण्यात आले.