
समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, तसेच या लोगोमध्ये कोणते रंग, तिरंगा घ्यायचा का, आकार आदींचा विचार केला जात आहे. आणि यावर सर्वांच एकमत होत नसल्यामुळं लोगोचे आज होणारे अनावरण लांबणीवर पडले आहे. इंडिया (I.N.D.I.A) आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई – इंडिया आघाडीची आज दुसरी बैठक होत आहे. विरोधकांच्या ऐक्याची म्हणजेच इंडिया आघाडीची बैठक कालपासून दोन दिवस मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडते आहे. (INDIA Meeting) पाटणा आणि बंगळुरुनंतर होत असलेल्या या मुंबईतल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यात विरोधकांच्या ऐक्याचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, असा प्रश्न सातत्यानं सत्ताधारी भाजपाकड़ून विचारण्यात येतो आहे. या प्रश्नाचं उत्तर मुंबईतल्या दोन दिवसांच्या बैठकीत मिळण्याची शक्यता आहे. तसेच आज दुसऱ्या दिवसाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय तसेच जागावाटप यावर चर्चा होणार असून, पंतप्रधान पदाचा चेहरा कोण हे देखील आजच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. तसेच आज या बैठकीत इंडियाच्या लोगोचे अनावरण होणार होत, मात्र ते आता लांबणीवर पडले आहे. (India Aghadi logo unveiling delayed; Glimpse of the tricolor in the logo?, due to which reasons…discord in the alliance)
कोणत्या कारणांमुळं लाबंणीवर…
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार काही पक्ष नव्याने आलेले आहेत त्यांना ही सहभागी करुन घेतले जाणार आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, तसेच या लोगोमध्ये कोणते रंग, तिरंगा घ्यायचा का, आकार आदींचा विचार केला जात आहे. आणि यावर सर्वांच एकमत होत नसल्यामुळं लोगोचे आज होणारे अनावरण लांबणीवर पडले आहे. इंडिया (I.N.D.I.A) आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कसा असणार लोगो?
लोगोसाठी एकूण पाच ते सात पर्याय आहेत, हे सर्व लोगो नव्यानं आलेले पक्ष आणि समितीसमोर ठेवले जातील, त्यानंतर यावरती अंतिम निर्णय होईल. तसेच या आघाडीला इंडिया नाव असल्याने या लोगोमध्ये राष्ट्रध्वजाचे तिरंगाची झलक दिसणार आहे. इंडिया आघाडीच्या लोगोसाठी नऊ डिझाईन तयार करण्यात आले होते. त्यातील एका डिझाईनला काही महत्त्वाच्या काही प्रमुख पक्षांनी संमती दिली आहे. तसेच प्रत्येक पक्षाचं निवडणूक चिन्ह असताना लोगोचे महत्व एवढं वाढवावं का याबद्दल मतमतांतरे आहेत. त्यामुळं सर्वांची मतं लक्षात घेऊनच निर्णय करावा, असा सूर बैठकीतून आला आहे. यामुळं लोगोचे अनावरण पुढे ढकलले आहे.