rain
संग्रहित फोटो

आज अखेर नैऋत्य मान्सून कोकणात (Southwest Monsoon Arrived At Kokan) दाखल झाला आहे.. पुढच्या चार ते पाच दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात दाखल होईल.

    मुंबई : मान्सूनची (Monsoon) वाट बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) माहिती दिली आहे की, आज अखेर नैऋत्य मान्सून कोकणात (Southwest Monsoon Arrived At Kokan) दाखल झाला आहे. त्यामुळे मान्सूनची प्रतिक्षा संपली आहे. बळीराजा सुखावला आहे.


    हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढच्या २४ तासांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकमध्ये थांबलेला मान्सून पुढे सरकला आहे. नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, तसेच संपूर्ण गोवा, कोकणचा काही भाग आणि कर्नाटकच्या काही भागात दाखल झाला आहे.

    गुरुवारी हवामान विभागानं पुढच्या ४८ तासांमध्ये मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कारण कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर रुळावर आली असून मान्सून आज कोकणात दाखल झाला आहे.

    आज मान्सून कोकणात दाखल झाला आहे. पुढच्या चार ते पाच दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात दाखल होईल. पुढील ४८ तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असा अंदाज आहे. दरम्यान मुंबईत दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर ठाणे, गोरेगाव, कल्याणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व सरींमुळं काहीसा दिलासा मिळाला आहे.