
साखळी फेरीतील आज दुसरा भारताचा सामना नेपाळविरुद्ध आहे. (India vs Nepal) गोलंदाजीत टीम इंडियाला मोठा धक्क बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह मायदेशी परतला आहे. बुमराह माघारी येण्याचं कोणतंही अधिकृत कारण समोर आलेलं नाही.
कोलंबो : श्रीलंका येथे सहा देशामध्ये क्रिकेट आशिया कप 2023 (Asia Cup) स्पर्धा सुरु आहे. भारताचा पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना पावसामुळं रद्द झाला. त्यामुळं दोन्ही संघाना एक-एक गुण देण्यात आला आहे. साखळी फेरीतील आज दुसरा भारताचा सामना नेपाळविरुद्ध आहे. (India vs Nepal) गोलंदाजीत टीम इंडियाला मोठा धक्क बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह मायदेशी परतला आहे. बुमराह माघारी येण्याचं कोणतंही अधिकृत कारण समोर आलेलं नाही. जसप्रीत बुमराहने वर्षभरानंतर कमबॅक केलं होतं. मात्र भारत-पाक सामना पावसामुळे रद्द झाला होता. आज भारताला हा सामना जिंकण्याची संधी आहे, मात्र सामन्यावर पावसाचे सावट आहे. (India vs Nepal match today, if it rains, will India suffer? How will the equation be)
पाऊस आल्यास भारत आशियाकपमधून बाहेर?
दरम्यान, ए गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ आहे. पाकिस्तानने नेपाळला मोठा फरकारने हरवले आहे. तर भारताविरुद्ध त्यांना एक गुण मिळाला आहे. भारताने आज नेपाळविरुध सामना जिंकल्यास भारताला दोन गुण मिळतील, अशान भारताचे एकूण तीन गुण होतील. दुसरीकडे ब गटात श्रीलंकेनं दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे चार गुण होतील. पाकिस्तान संघाचे तीन गुण झाले आणि +4.760 रन रेट आहे. जर आजच्या सामन्यात पाऊस आला तर भारत आणि नेपाळला एक-एक गुण देण्यात येईल. याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो.
भारतासाठी करो या मरो….
पाकिस्तानविरोधातील सामन्यात भारताला एक गुण मिळाला. जर नेपाळविरोधातील सामनाही पावसामुळे रद्द झाला तर दोन गुणांसह भारतीय संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करेल. जर भारताचा पराभव झाला तर नेपाळचा संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करेल. आशिया चषकात सहा संघांना दोन गटामध्ये विभागण्यात आले आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे संघ एकाच गटामध्ये आहेत. श्रीलंका, बांगलादेश आणि आफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहे. साखळी सामन्यातील आघाडीचे दोन संघ सुपर ४ साठी पात्र ठरतील. पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करेल.
सामना कधी व कुठे
भारतीय वेळेनुसार सामना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुरु होईल. अडीच वाजता नाणेफेक होईल. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार अॅप
संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा