श्रीलंकेत राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेलेत तशी स्थिती भारतात निर्माण होईल; खासदार संजय राऊत यांचा इशारा

अयोध्येच्या आंदोलनात दोन्ही बाजूने हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. त्यानंतर आता राम मंदिर उभे राहत आहे. राम मंदिर आमच्या सर्वांच्या अस्मितेचा विषय होता. ते उभे राहत आहे. त्यामुळे आता देशात महागाई, बेरोजगारी, राष्ट्रीय सुरक्षा या विषयाकडे पाहणे गरजेचे आहे. काही काळ वादग्रस्त विषय दूर ठेवावे लागतील, अन्यथा श्रीलंकेत राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेलेत ती स्थिती भारतात निर्माण होईल, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे(India will be in the same position as Sri Lanka MP Sanjay Raut's warning).

    मुंबई : अयोध्येच्या आंदोलनात दोन्ही बाजूने हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. त्यानंतर आता राम मंदिर उभे राहत आहे. राम मंदिर आमच्या सर्वांच्या अस्मितेचा विषय होता. ते उभे राहत आहे. त्यामुळे आता देशात महागाई, बेरोजगारी, राष्ट्रीय सुरक्षा या विषयाकडे पाहणे गरजेचे आहे. काही काळ वादग्रस्त विषय दूर ठेवावे लागतील, अन्यथा श्रीलंकेत राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेलेत ती स्थिती भारतात निर्माण होईल, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे(India will be in the same position as Sri Lanka MP Sanjay Raut’s warning).

    देशाचा रुपया 77 रुपये प्रति डॉलर इतका खाली घसरला आहे. इतिहासात रुपया इतका खाली घसरला नव्हता. देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. लोकांना नोकऱ्या नाहीत, महागाईशी सामना करता येत नाही.

    राज्यकर्ते आणि सर्व पक्षांनी यावर बोलणे गरजेचे आहे. ज्ञानवापीवरून होणाऱ्या ‘झाकी, बाकी’ या गोष्टी देश तोडणाऱ्या आहेत. या देशाला आता स्थिरता हवी आहे. श्रीलंकेसारखी परिस्थिती येऊ नये असे वाटत असेल तर राज्यकर्ते आणि राजकारण्यांनी लोकांच्या प्रश्नावर बोलावे असेही संजय राऊत म्हणाले.