Indica car going from Chandrapur to Amravati overturned, one dead on the spot, two seriously injured

तिघे चंद्रपूर वरून अमरावती कडे इंडिका गाडी क्रमांक एम एच ४० जे ८८२५ ने जात असतांना वाहन पलटी झाले. यात राजू चिकाटे हा जागीच ठार झाला. उर्वरित दोघांना प्रथमत: ग्रामीण रुग्णालय धामनगाव (Rural Hospital Dhamangaon) येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने अमरावती (Amravati) येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले.

    धामणगाव रेल्वे : चंद्रपूर (Chandrapur) कडून अमरावती (Amravati) कडे जाणारी इंडिका गाडी (Indica car) पलटी झाल्याने एक जण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना तळेगाव (Talegaon )दशासर ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. राजू रामचंद्र चिकाटे (Raju Ramachandra chikate )(३५ रा .कुटवाळा जि. चंद्रपूर) असे मृतकाचे नाव आहे. राजू हा अपघातात जागीच ठार झाला.

    मयूर विनोद डागर (३३, माता कॉलनी महू जि. इंदोर) मोरेश्वर हिवरे (३६) अशी जखमींची नावे आहेत. हे तिघे चंद्रपूर वरून अमरावती कडे इंडिका गाडी क्रमांक एम एच ४० जे ८८२५ ने जात असतांना वाहन पलटी झाले. यात राजू चिकाटे हा जागीच ठार झाला. उर्वरित दोघांना प्रथमत: ग्रामीण रुग्णालय धामनगाव (Rural Hospital Dhamangaon) येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने अमरावती (Amravati) येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले.