‘इंडिगो’ची विमानसेवा पुन्हा सुरू; चिकलठाणा विमानतळावरुन घेणार उड्डाण…

इंडिगो विमानसेवेच्या वतीने चिकलठाणा विमानतळावरुन पाच शहरांसाठी उन्हाळी सत्रातील उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी ही सेवा 31 मार्चपासून सुरु होत आहे.

    छत्रपती संभाजीनगर : इंडिगो विमानसेवेच्या वतीने चिकलठाणा विमानतळावरुन पाच शहरांसाठी उन्हाळी सत्रातील उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी ही सेवा 31 मार्चपासून सुरु होत आहे. कोरोनाआधी चिकलठाणा येथून 30 विमाने उड्डाण करत होती.

    आता उन्हाळ्यात 12 विमाने इंडिगो एअरलाईन्स सुरु करत आहे. यात उदयपूर व इंदूरसाठीही नंतर विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे. तर सायंकाळी 7.20 ला येथेच जाणारे दुसरे विमान 8.55 ला पोहोचेल. हैदराबादचे इंडिगो विमान 7.20 येईल व पावनणेनऊला परतेल. तसेच चिकलठाणा विमानतळ ते हैदराबाद रात्री ९.१० ला रवाना होणारे विमान १०.३५ ला पोहोचेल. मुंबईला शेवटचे विमान रात्री ९.२५ ला रवाना व १०.२० ला सीएसटीवर पोहोचेल, अशी माहिती इंडिगोचे विमानतळ व्यवस्थापक अनिरुद्ध पाटील यांनी दिली.

    8 लहान 6 मोठी विमाने येणार

    मुंबई ते छत्रपती संभाजीनगर हे विमान सकाळी ५.१५ ला निघून ६.१५ ला येईल व येथून ६.४५ ला निघून ७.४० ला मुंबईत पोहोचेल. हैदराबाद येथून ६.२० ला छत्रपती संभाजीनगरला आलेले विमान पुन्हा ७.४५ ला निघणार आहे.