indrani mukharjee

तब्बल साडेसहा वर्षानंतर इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukahrjee) आता जेलच्या बाहेर आली आहे. इंद्राणी मुखर्जीवर शीना बोराची हत्या (Sheena Bora Murder Case) केल्याचा आरोप होता.

    मुंबई:  सुप्रीम कोर्टाकडून इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukarjee)  जामीन मिळाला होता. तब्बल साडेसहा वर्षानंतर इंद्राणी मुखर्जी आता जेलच्या बाहेर आली आहे. इंद्राणी मुखर्जीवर शीना बोराची हत्या (Sheena Bora Murder Case) केल्याचा आरोप होता. शीना बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणी २०१५ पासून मुंबईच्या (Mumbai) भायखळा जेलमध्ये (Byculla Jail) बंद होती. जेलमधून बाहेर पडताच इंद्राणी मुखर्जीनी आनंद व्यक्त केला आहे. मी खूप खूश आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

    इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज याआधी अनेकदा फेटाळण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालय, उच्च न्यायालय कोणीही तिला जामीन दिलेला नव्हता. कारण तिने आपला आधीचा नवरा आणि ड्रायव्हर यांच्या मदतीने मुलगी शीना बोरा (Sheena Bora Murder Case) हिची हत्या केल्याचा आरोप होता. यात तिचा एक पती पीटर मुखर्जीचाही हात होता. याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होत्या. गेल्या तीन वर्षांत इंद्राणीने (Indrani Mukharjee) एकही पॅरोल घेतला नव्हता.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तिला जामीन दिला आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर विशेष सीबीआय कोर्टाने त्यांच्यासाठी असलेल्या अटी शर्थी निश्चित केल्यानंतर त्यांना आज तुरुंगातून बाहेर सोडण्यात आले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर इंद्राणी मुखर्जी त्यांच्या वकिलांसोबत आपल्या मर्सिडीज कारमधून घराकडे रवाना झाल्या.

    शीना बोरा हत्याकांड
     शीना बोराची २४ एप्रिल २०१२ रोजी हत्या करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर शामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि चालक शामवर राय यांनी मिळून इंद्राणीची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिची हत्या केली आणि रायगड जिल्ह्यात एका अज्ञात स्थळी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.