ढगाळ वातावरणामुळे तुरीवर किडीचा प्रादुर्भाव; पाऊस, धुकेही ठरतंय कारणीभूत

जिल्ह्यात 25 नोव्हेंबरपासून सतत ढगाळ वातावरण व पाऊस तसेच सकाळी धुके पडत आहे. त्यामुळे तूर पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तुरीवरील पिसारी पतंग अळी हिरवट रंगाची, मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकाकडे निमुळती होत गेलेली पाठीवर काटेरी लव लहान अळ्या फुले शेंगांना छिद्र पाडून दाने खाते. अळी शेंगाच्या आत कधीच शिरत नाही.

    वाशिम : जिल्ह्यात 25 नोव्हेंबरपासून सतत ढगाळ वातावरण व पाऊस तसेच सकाळी धुके पडत आहे. त्यामुळे तूर पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तुरीवरील पिसारी पतंग अळी हिरवट रंगाची, मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकाकडे निमुळती होत गेलेली पाठीवर काटेरी लव लहान अळ्या फुले शेंगांना छिद्र पाडून दाने खाते. अळी शेंगाच्या आत कधीच शिरत नाही.

    नियंत्रणासाठी पिसारी पतंगाच्या 5 ते 10 अळया प्रति 10 झाडे आढळून आल्यास मोनोग्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही 11 मिली 10 लिटर पाण्यात घेऊन फवारावे. तुरीच्या शेंगावरील माशी अळी पांढऱ्या रंगाची असून गुळगुळीत असते. अळीला पाय नसतात व अळीच्या तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी पुर्ण विकसीत झाल्यानंतर शेंगाला छिद्र पाडून बाहेर पडते. ही अळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते.

    अळी दाने कुरतडून खात असल्यामुळे दाण्याची मुकणी होते. नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के इसी 20 मिली किंवा मानोक्रोटोफॉस 36 टक्के एसएल 11 मिली अधिक 10 लिटर पाणी घेऊन फवारावे. प्रत्येक फवारणी करतांना बुरशीनाशक कार्बनडायझिन किंवा प्रापॅकोनोझॉल टाकून फवारणी केल्यास शेंगा/पानावरील करपा रोगाचे नियंत्रण करता येते. हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे व हेलिकोव्हर्पाचे ल्युर्स लावावे.

    जेणेकरुन या किडीचे नर पतंग आकर्षित होऊन काही प्रमाणात नियंत्रण होण्याबरोबरच किडीची तिव्रता समजल्यामुळे योग्यवेळी फवारणी करणे शक्य होईल व किटकनाशकावर होणारा खर्च टाता येईल. तरी शेतकऱ्यांनी तुरीवरील मुख्य किडी ओळखून त्याप्रमाणे नियंत्रण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी केले आहे.