Students will get special books in the new class, textbooks based on 2 year curriculum, 2022-23 session education awareness year

शैक्षणिक साहित्य म्हणजे अगदी पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून गणवेशापर्यंत सगळ २० ते ३० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

    बुलडाणा : वाढत्या महागाईचा फटका आता शालेय जीवनासह अभ्यासावरही होणार आहे. यावर्षी वह्या पुस्तके खरेदी करायला जाताय तर तुम्हाला खिशाला कात्री लागणार आहे. आता शालेय साहित्याच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. वह्या आणि पुस्तकांच्या २० ते ३० टक्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक खर्चाचा भार वाढणार असल्याचं चित्र आहे.

    वह्या आणि पुस्तके तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती कोरोना काळात वाढल्याने तसेच कागदाचे प्रतिकिलो दर वाढले आहेत. सद्या स्थितीला महागाईमुळे सर्वसामान्यांसह समस्त जनता जर्नादन हवालदिल झालेले आहे. वाढत्‍या महागाईमुळे घराचे व्यवस्थापन कोलमडल्‍याचे दिसून येत आहे. त्‍यातच शिक्षण हा महत्‍वाचा भाग असल्‍याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करण्याची जबाबदारी पालकांची असल्याने सुरु होणाऱ्या शिक्षण सत्राकरीता लागणाऱ्या शैक्षणिक साहित्‍याची खरेदी ही सुध्दा माहगली असल्याने पुर्वीपेक्षा २० ते ३० टक्क्यांनी शालेय वह्या पुस्तके, व शैक्षणिक साहित्‍यात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. शाळा सुरु होणार असल्याने पालक वह्या, पुस्तके खरेदी करण्याकडे कल दिसून येतो. मात्र आता हेच शैक्षणिक साहित्य म्हणजे अगदी पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून गणवेशापर्यंत सगळ २० ते ३० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. सद्या शाळा सुरु होण्यास वेळ आहे मात्र काही नागरिक शालेय साहित्य घेण्यासाठी जात आहे.