Outline of a crowd of angry people,
Outline of a crowd of angry people,

    मंचर :  किसान सभेच्या वतीने  जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या, शेतमजूर,निराधार महिला-पुरुष, आदिवासी, दलित, महिला,भटके-विमुक्ताचे विविध प्रश्न, विविध मागण्या सोडविण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  बेमुदत धरणे आंदोलन बुधवार (दि. २३) रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे होणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे यांनी दिली.
    पुणे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, निराधार महिला-पुरुष,आदिवासी,दलित,महिला,भटके-विमुक्ताचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. प्रमुख मागण्या-राज्यशासनाने,ओला दुष्काळ त्वरित जाहीर करून एकरी ५० हजार रुपये अनुदान शेतकरी बांधवाना द्यावे.शेतकऱ्यांचे संपर्ण खरीप कर्ज माफ व्हावे.पुणे जिल्ह्यातील आदिवासी कातकरी,भिल्ल,ठाकर व भटके विमुक्त समाजाच्या वस्त्यांना पक्के रस्ते मिळावेत तसे इतर ही सेवा सुविधा मिळाव्यात. या समुदायाला विविध शासकीय ओळखपत्रे व रेशनकार्ड मिळवीत. मावळ तालुक्यातील ठाकर समुदाय मागील एक वर्षे जातीचे दाखले काढण्यासाठी सरकार दरबारी खेटे मारत आहे.परंतु त्यांना अद्याप जातीचे दाखले मिळाले नाहीत. ते त्वरित मिळावेत. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी, इत्यादी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
    -वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी
    चुकीच्या पद्धतीने जे वनहक्क दावे नामंजूर केले आहेत ते मंजूर करावेत. राज्यशासनाने, आदिवासी विकास महामंडळाला, बाळहिरडा खरेदी करण्यासाठी आवश्यक तो निधी तत्काळ उपलब्ध करून देवून,तातडीने बाळहिरडा खरेदी केंद्रे तालुका निहाय ता त्काळ सुरु करावी व त्यास रास्त हमीभाव द्यावा. हिरड्याची झाडे सातबारा उताऱ्यावर नोंद व्हावी,यासाठी विशेष मोहीम राबवावी. निसर्ग चक्रीवादळात बाळहिरड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,त्यावेळी शासनाने पंचनामे केले होते,परंतु ही नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही,ही नुकसान भरपाई त्वरित मिळावी. वर्षानुवर्षे कसणाऱ्या व कुळ कायद्याच्या जमिनी तसेच बेकायदेशीर रित्या आदिवासींच्या जमिनी इतर समाजातील काही व्यक्तींच्या नावे केल्या गेल्या आहेत. या सर्व जमिनी मूळ मालक असणारे आदिवासी बांधव यांच्या नावे व्हाव्यात. इत्यादी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभेचे उपाध्यक्ष एड. नाथा शिंगाडे, सचिव विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, आमोद गरुड, संतोष कांबळे यांनी दिली.
    ————-