महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती मिळणार एका क्लिकवर; गिरीश महाजन यांच्या हस्ते व्हाट्सअ‍ॅप चॅटबॉट लाँच

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अग्रगण्य प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र टूरिझमने महाराष्ट्रात प्रवास आणि व्यापाराच्या संधी वाढविण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली.

  मुंबई :  राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अग्रगण्य प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र टूरिझमने (Maharashtra Tourism) महाराष्ट्रात (maharashtra) प्रवास आणि व्यापाराच्या संधी वाढविण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली. आपली प्रचंड क्षमता ओळखून महाराष्ट्र पर्यटन विभागाने राज्यामध्ये व्यवसाय आणि व्यापार सहकार्‍यांना चालना देत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अभ्यागतांना आकर्षित करण्यासाठी आपल्या अद्वितीय सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक संपत्तीचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

  वैविध्यपूर्ण भूमी, व्हायब्रंट शहरे आणि समृद्ध वारसा असलेले महाराष्ट्र राज्य हे प्रवासी आणि शोधकांसाठी (एक्फ्लोरर) दीर्घकाळापासून आवडते ठिकाण राहिलेले आहे. मुंबईसारखे गजबजलेले महानगर, लोणावळा आणि महाबळेश्वरसारखी चित्तथरारक हिल स्टेशन्स, अजिंठा आणि एलोरा ही प्राचीन लेणी तसेच अलिबाग आणि तारकर्लीचे निर्मळ समुद्रकिनारे यासारख्या प्रतिष्ठित ठिकाणांनी राज्याच्या निसर्गसौंदर्यात भर घातली आहे. महाराष्ट्राचे अफाट सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन करून जगभरातील पर्यटकांसाठी एक आवश्यक ठिकाण म्हणून स्थान देण्याचा पर्यटन विभागाचा मानस आहे.

  महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी एआय-संचालित व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट (+91 94038 78864) लाँच केला. हा चॅटबॉट राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य आणि विविध आकर्षणे एक्सप्लोर करण्यासाठी संवादात्मक आणि माहितीपूर्ण ठरणार आहे. मोबाईल फोनच्या सुविधेद्वारे चॅटबॉट हा आपल्या गंतव्यस्थानांबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे, काय करावे आणि करू नये अशा सर्वकाही गोष्टी, निवास आणि अशा अनेक गोष्टींबाबत इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये माहिती देणार आहे. ज्यामुळे तुमच्या ट्रिपचे नियोजन अगदी अचूक बनेल.

  डिजिटल साधनांचा स्वीकार केल्याने अनुभव समृद्ध होतात – मंत्री गिरीश महाजन 

  महाराष्ट्राच्या पर्यटन क्षमतेबाबत पर्यटन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की,  रस्त्यापासून हवाई मार्गापर्यंतची अखंड कनेक्टिव्हिटी प्रवाशांना आपल्या वैविध्यपूर्ण प्रदेशाचा (लँडस्केप्स) शोध घेण्यास भाग पाडते. तसेच वैविध्यपूर्ण राहण्याची सोय, लक्झरी रिसॉर्ट्सपासून ते आरामदायी होमस्टेपर्यंत सर्व गोष्टी प्राधान्ये पूर्ण करण्यास मदत करतात. डिजिटल साधनांचा स्वीकार केल्याने अनुभव समृद्ध होतात आणि सेवा सुव्यवस्थित होतात. तरीही, आमच्या प्रयत्नांना आधार देणे, आमचा वारसा जतन करणे आणि स्थानिक समुदायांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. याद्वारे केवळ आर्थिक हित साधण्याचा प्रयत्न नसून महाराष्ट्राला जगासमोर एका वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करण्याला प्राधान्य देणार आहे. सरकार, खाजगी क्षेत्र, समुदाय आणि नागरिकांनी एकत्र मिळून एक व्हायब्रंट, शाश्वत पर्यटन वारसा तयार करूया. असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

  तसेच महाराष्ट्र पर्यटनाच्या उपक्रमांवर भाष्य करताना, महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या सचिव, जयश्री भोज म्हणाल्या, “महाराष्ट्रात आमच्याकडे ऐतिहासिक चमत्कारांपासून ते प्राचीन समुद्रकिनार्‍यांपर्यंत पर्यटनाच्या खजिन्याचा वारसा आहे, हे सर्व आमच्या समृद्ध सांस्कृतिकतेने जोडलेले आहे. २०२४-२०२५च्या दिशेने वाटचाल करत असताना ११ किल्ल्यांसाठी युनेस्कोच्या मान्यतेने आम्ही केवळ प्रवासाच्या पलीकडे पर्यटनाला चालना देण्यासाठी आमची बांधिलकी जपत आहोत. आमचा पर्यटन विभाग परिश्रमपूर्वक धोरणे तयार करतो. खाजगी तसेच एमटीडीसीसारख्या मागीदारांच्या गरजा पूर्ण करतो. सहयोगी प्रयत्न आणि मजबूत धोरणांमुळे शाश्वत पर्यटन इकोसिस्टमची कल्पना करतो. आमच्या आगामी सर्वसमावेशक धोरणाला आकार देण्यासाठी मौल्यवान अंतर्दृष्टींसाठी खुले आमंत्रण देऊन आम्ही महाराष्ट्राच्या पर्यटन कथनाला एकत्रितपणे साकारत असताना या प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा,” असे आवाहन जयश्री भोज यांनी पर्यटकांना केले.

  महाराष्ट्र सरकारचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी एएआय धोरण (पॉलिसी) (https://maharashtratourism.gov.in/aai-register/)  लॉन्च केली. महिला उद्योजकांना पर्यटन क्षेत्रात सक्षम करणे हा महाराष्ट्र सरकारने आणलेल्या आई पॉलिसीचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत, पर्यटन विभाग प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या मालकीच्या आणि चालवल्या जाणार्‍या दहा व्यवसायांची नोंदणी करण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये होमस्टे, हॉटेल्स/रेस्टॉरंट्स, टूर आणि ट्रॅव्हल एजन्सी आणि बरेच काही यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. हे धोरण संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगातील महिलांमध्ये उद्योजकता आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आले आहे

  प्रस्तावित पर्यटन धोरणाबद्दल पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन. पाटील म्हणाले, “महाराष्ट्राचे पर्यटन क्षेत्र लक्षणीय महसूल आणि रोजगाराच्या संधी देते, ज्यामध्ये ५ दशलक्ष नोकर्‍या निर्माण झाल्या आहेत. पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी, आम्ही’ छुपे रत्नांचे पुनर्ब्रँडिंग करणे, स्थानिक सणांना प्रोत्साहन देणे आणि धोरणे सुव्यवस्थित करणे यासारख्या धोरणात्मक उपक्रमांवर पुन्हा लक्ष केंद्रित करत आहोत. नावीन्यपूर्ण आणि सहयोगाद्वारे महाराष्ट्राची पर्यटन क्षमता अनलॉक करणे, सर्व भागधारकांसाठी आर्थिक समृद्धी आणण्याचे आमचे ध्येय आहे.”

  पॅनेलिस्ट संतोष सूर्यवंशी, एमडी (आयुर्वेद) पी. जी. सी. सी.(पंचकर्म थेरपी); चंदन बडसावळे, संचालक, सगुणाबाग ऍग्रो टुरिझम प्रा. लि.; विस्तास्प खरस, पॅराग्लायडिंग प्रोफाइल आणि इंटीरियर आर्किटेक्ट; सचिन पांचाळ, संस्थापक, मोटोहोम कारव्हान्स, यांनी महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण लँडस्केप आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा पर्यटन वाढीसाठी अपार क्षमतेवर भर दिला. कृषी-पर्यटन, वेलनेस आणि साहसी पर्यटन यासारख्या विशिष्ट क्षेत्रांचा फायदा घेऊन राज्य पर्यटकांच्या सहभागासाठी नवीन मार्ग उघडू शकते. कृषी-पर्यटन ग्रामीण जीवन, शेतातील मुक्काम, आणि पाककलेचे आनंद देणारे अनुभव देते, जे महाराष्ट्राची कृषी मुळे दर्शवते. आयुर्वेद पर्यटन प्राचीन उपचार परंपरेचा उपयोग करते, तंदुरुस्ती साधकांना शांत वातावरणात नवचैतन्य प्राप्त करण्यासाठी आकर्षित करते. साहसी पर्यटन महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचा फायदा घेते, ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि वन्यजीव सफारी यांसारख्या रोमांचकारी टुरिझमची ऑफर देते. धोरणात्मक प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे, महाराष्ट्र स्वतःला एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून स्थान देऊ शकतो, विविध प्रवासी हितसंबंधांची पूर्तता करून आणि आर्थिक समृद्धीला चालना देऊ शकतो.

  आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पर्यटनाची क्षमता ओळखून, महाराष्ट्र पर्यटन राज्यात गुंतवणूक आणि व्यावसायिक भागीदारी सुलभ करण्यासाठी वचनबद्ध आहे. पर्यटन मंडळ आदरातिथ्य, प्रवास, खाद्यपदार्थ आणि पेय क्षेत्र आणि हस्तकला या क्षेत्रांमध्ये व्यापाराच्या संधींना चालना देण्यासाठी उद्योगातील नेते, चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि व्यापार संघटनांशी सक्रियपणे सहभागी होईल. लक्ष्यित उपक्रम आणि प्रचारात्मक मोहिमांद्वारे, महाराष्ट्र पर्यटनाचे उद्दिष्ट उद्योजक आणि गुंतवणूकदारांना राज्याच्या अफाट क्षमता आणि अप्रयुक्त संधींचा शोध घेण्यासाठी आकर्षित करण्याचा आहे. अशी माहिती देण्यात आली.

  प्रवास आणि व्यापाराच्या संधींना चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटनाची महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्राला पर्यटन आणि व्यापारासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या राज्य सरकारच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. आपल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपत्तीचा लाभ घेऊन, पर्यटन मंडळाचे उद्दिष्ट आहे की एक समृद्ध पारिस्थितिक प्रणाली तयार करणे ज्याचा अभ्यागत आणि रहिवाशांना फायदा होईल आणि शेवटी राज्याच्या आर्थिक वाढ आणि समृद्धीला हातभार लागेल.