rajan salvi

शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी बुधवार १४ डिसेंबर रोजी साडे अकरा वाजता अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. आमदार राजन साळवी यांच्या राजकीय प्रवास , कौटुंबिक व्यवसाय आणि वाढलेल्या संपत्तीवर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्य केले होते. बॅंक स्टेटमेंट, आरटीआेकडील कागदपत्र, 1982 ते 1992 या कालावधीत सरकारी नाेकरीत असतानाचीही चाैकशी करण्यात आली. आमदार राजन साळवी यांनी राजकीय प्रवासा दरम्यान संपत्ती जमवून ठेवली असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे आहे.

    अलिबाग ः जी मालमत्ता माझ्याकडे नाही, त्याच मालमत्तेविषयीची माहिती माझ्याकडे मागितली जात आहे. सातत्याने तेच प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र मी तपास यंत्रणांना सहकार्य करत असल्याची माहिती ठाकरेे गटाचे आमदार राजन साळवी यांनी अलिबाग येथे दिली. आमदार साळवी यांची अलिबागच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल सहा तास चाैकशी केली. पुन्हा 10 फेब्रुवारी 2023 राेजी चाैकशीला बाेलवल्याचे आमदार साळवी यांनी स्पष्ट केले.

    कोणत्याही पद्धतीची माहिती आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बंधनकारक आहे. माझा न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे . माझ्या चौकशी नंतर माझ्या नातेवाईकांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांकडून नाहकचा त्रास दिला जात आहे . कोणत्याही पद्धतीची चौकशी झाली तरी आम्ही डगमागणार नाही . शिवसेना प्रमुखांनी आम्हाला रडायला नाही तर लढायला शिकवले आहे. आमदार राजन साळवी यांनी सांगितले .

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही शिवसैनिक आहोत . शिवसेना प्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवले आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आमदार आहे. यामुळे नाहक मला दडपशाही धोरणाने शासन त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला नोटीस पाठवून त्रास देण्याचा धडाका आताच्या सरकारने लावला आहे. असा आरोप करून सुरु असलेल्या दडपशाहीला आम्ही जुमानत नाही. अशा शब्दात आमदार राजन साळवी यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

    शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी बुधवार १४ डिसेंबर रोजी साडे अकरा वाजता अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. आमदार राजन साळवी यांच्या राजकीय प्रवास , कौटुंबिक व्यवसाय आणि वाढलेल्या संपत्तीवर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्य केले होते. बॅंक स्टेटमेंट, आरटीआेकडील कागदपत्र, 1982 ते 1992 या कालावधीत सरकारी नाेकरीत असतानाचीही चाैकशी करण्यात आली. आमदार राजन साळवी यांनी राजकीय प्रवासा दरम्यान संपत्ती जमवून ठेवली असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे आहे. लाचलुचपत विभागाने दिलेल्या सहा फॉर्मची भरलेली माहिती देण्यासाठी शुक्रवार २० जानेवारी रोजी आमदार राजन साळवी अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अलिबाग येथे आले होते. आज सलग सहा तास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कसून चौकशी केली. आमदार राजन साळवी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कागदपत्रे सादर केली . सादर कागदपत्रांच्या आधारे अधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला होता. अद्यापही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी वर्गाचे कागदपत्रे आणि उत्तरांवर समाधान झालेले नाही. यांमुळे 10 फेब्रुवारीला पुन्हा अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.