पाच दिवसात १० लाख दस्तवेजांची तपासणी, प्रशासनाचा महाप्रचंड वेग; आत्तापर्यंत २ हजाराहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या

राठा आरक्षणाच्या मागणीसाठी कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात ८ नोव्हेंबर अखेर १०  लाखांवर दस्तावेजांची तपासणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत २ हजाराहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. गावागावात शिक्षक या नोंदी शोधत आहेत

  प्रवीण शिंदे, सांगली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात ८ नोव्हेंबर अखेर १०  लाखांवर दस्तावेजांची तपासणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत २ हजाराहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. गावागावात शिक्षक या नोंदी शोधत आहेत, मात्र जिल्हा पातळीवर अवघ्या २० कर्मचाऱ्यांनी चार दिवसात दहा लाख दस्ताऐवजांची तपासणी कशी केली ?, प्रशासनाचा इतका प्रशासनाचा महाप्रचंड वेग कसा काय ?, असा सवाल उपस्थित होतोय, त्यामधून ही तपासणी अधिक गांभीर्याने करण्याची गरज निर्माण झाली आहे.

  मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली आहे. त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. त्यानुसार सांगली  जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामध्ये एकुण वीस कर्मचारी काम करीत आहेत, जिल्हाभरातून दस्ताऐवज येत आहेत, मात्र म्हणावे तितके त्याबाबत प्रशासन गंभीर नाही असेच दिसत आहे.

  -अशी केली तपासणी
  या विशेष कक्षांमार्फत ८ नोव्हेंबरअखेर १० लाख ६ हजार ६५५ दस्तावेजांची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या दस्तावेजातून २ हजार २११ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. यामध्ये मराठी भाषेतील २ हजार १५७ व मोडी लिपीतील ५४ नोंदींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

  तालुका निहाय नोंदी अशा
  तालुका………तपासणी………….सापडलेल्या नोंदी
  मिरज………. ४, २५, ५१८…………..१८३
  तासगाव……..२,५, ७८७……………..५४६
  कवठेमहांकाळ….५०, ९७७……………४१
  जत……………… ३, २०५……………..०
  खानापूर- विटा……७७,५३७…………..१६
  आटपाडी………….२७,८०३…..………..०
  कडेगाव…………….२२,३८१..…………१३
  पलूस……………..४१,५६२…..………….३
  वाळवा……………..७५,४१६..………..६०५
  शिराळा…………….१,७२३……………८०४
  सांगली (अप्पर)…..७४,७४९…………….०

  काय आहेत अडचणी
  अनेक शाळांचे  रेकॉर्ड उपलब्ध नाही.
  अशैक्षणिक कामांवर शिक्षक नाराज.
  बिगर मगास नोंदीचा विचार केला जात नाही.
  मोडी लिपी वाचता येणारे कमी लोक.

  कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत नागरिकांकडे काही कागदोपत्री पुरावे असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरीय कक्षाकडे सादर करावेत.

  - डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी सांगली

  कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात काम सुरुय, मात्र प्रशासन, यंत्रणा यांनी प्रचंड गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कारण हा विषय अनेकांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. नोंदी योग्य प्रकारे तपासणे गरजेचे आहे.

  अजितराव घोरपडे, माजी मंत्री