अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची अंबादास दानवेंकडून पाहणी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज धरणगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नुकसानीची माहीती घेतली. तसेच सरसगट पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले.

    धरणगाव : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज धरणगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नुकसानीची माहीती घेतली. तसेच सरसगट पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले.

    दिवाळी आनंदी शिधा ही योजना नियोजनअभावी फसली असून अनेकांना आजही शिधा मिळाली नसल्याची तक्रार सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली. तसेच संजय गांधी निराधार योजनेची मागील काही महिन्यांपासून बैठक घेतली नसल्याची बाब देखील दानवे यांच्या लक्षात आणून दिली.

    दरम्यान, धरणगावचा पाणी पुरवठा विषयी तर गुलाबराव वाघ आणि माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बैठकीत चांगलेच वाभाडे काढले. यावेळी विष्णू भंगाळे, अॅड. शरद माळी, धीरेंद्र पुरभे, योगेश वाघ, जानकीराम पाटील, विनोद रोकडे जयेश माळी हे उपस्थित होते.