जिल्हा परिषद कारभाराची तपासणी; सीईओ देणार साक्ष, पीआरसी कमिटीचा दौरा निश्चित

जिल्हा परिषद कारभाराची तपासणी होणार असून, सीईओ दिलीप स्वामी यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून पीआरसी कमिटी (पंचायती राज्य समिती) २६ मे रोजी सोलापूर जिल्हा परिषदेचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.

    सोलापूर : जिल्हा परिषद कारभाराची तपासणी होणार असून, सीईओ दिलीप स्वामी यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून पीआरसी कमिटी (पंचायती राज्य समिती) २६ मे रोजी सोलापूर जिल्हा परिषदेचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.

    २६ मे गुरुवार सन २०१५-२०१६ व २०१६-२०१७ च्या लेखा परिक्षा पुनर्विलोकन अहवालातील सोलापूर जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदासंदर्भात सीईओ दिलीप स्वामी यांच्यासह विभाग प्रमुखांची साक्ष यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.

    २७ मे रोजी जिल्हयातील पंचायात समितीना भेटी देण्यात येणार आहेत. याचदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रे, जि. प. प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतींना भेटी, पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची प्रश्नावली क्रमांक “दोन” च्या संदर्भात साक्ष नोंदविण्यात येणार आहे. २८ मे रोजी जिल्हा परिषदेच्या सन २०१७-२०१८ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात अंतिम साक्ष सीईओ स्वामी यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.

    केंद्र सरकारच्या पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायात राज्य अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेला पुरस्कारापासून मुकावे लागले होते. माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी सीईओ अरूण डोंगरे यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्हा परिषदेचा दुसरा क्रमांक राज्यात आला होता. यंदा प्रथम क्रमांक यावा, अशी अपेक्षा माजी सदस्यांनी व्यक्त केली आहे.