2225 hectares of crops were damaged and 5000 farmers including 364 villages were affected

पूरपरिस्थितीचा फटका बसलेल्या प्रत्येक गावातील एका प्रतिनिधीकरवी जिल्हाधिकारी यांचे सोबत आपली आपबिती कथन करून जास्तीत जास्त मदतीचा ओघ कसा निर्माण करता येईल, यासाठी मी स्वतः प्रत्यक्षात हजर राहून तातडीची बैठक उद्या बोलावितो. यावेळी पिडीत शेतकऱ्यांचे एका प्रतिनिधींनीला यवतमाळ येण्याच्या सूचना केल्या.

  मारेगाव : अतिवृष्टी व पुरस्थितीने दुसऱ्यांदा मेटाकुटीस आलेल्या पिडीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी विदारक पुरपरिस्थितीची पाहणी करीत तात्काळ मदतीच्या ओघाचा अंमल करण्याचे अभिवचन दिले.

  मारेगाव तालुक्यातील (Maregaon Taluka) काही भागात पुरपरिस्थितीने शेतीची पूर्णपणे वाट लागली आहे. पंधरा दिवसांपूर्वी शेकडो हेक्टर जमिनीतील तूर, कापूस व सोयाबीन पिके पाण्याखाली गेले होते. यातून शेतकऱ्यांनी सावरण्याचा प्रयत्न करीत दुबार, तिबार पेरणी केली. तोच परत मुसळधार पाऊस व बेंबळा प्रकल्पाच्या (Bembala Project) विसर्गाने नदी नाल्यांना पूर येऊन वर्धा नदीच्या (Wardha River) शेजारी असलेल्या शेतीतील पिके पाण्याखाली गेली. काही गावांना पाण्याने विळखा घातला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन आर्थिक स्थिती मेटाकुटीस आली.

  दरम्यान, खासदार बाळू धानोरकर यांनी मारेगाव तालुक्यातील शिवणी, वनोजादेवी व दापोरा (Vanojadevi and Dapora) येथील पूरपरिस्थितीची विदारक पाहणी करीत जास्तीत जास्त हेक्टरी मदत देण्याची भूमिका विशद केली.

  परिणामी, पूरग्रस्तांना तात्काळ मदत प्राप्त व्हावी, यासाठी आपण ठोस उपाययोजना करून लवकरच अन्न धान्याचे वाटप करणार असल्याची माहिती यावेळी खा.धानोरकर यांनी दिली. याप्रसंगी माजी आमदार वामनराव कासावार, अरुणा खंडाळकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, आशिष कुळसंगे, वसंतराव आसुटकर, पालाश बोढे, रवींद्र धानोरकर, नंदेश्वर आसुटकर, अंकुश माफुर तसेच इतर अधिकारी यांचे सह पिडीत शेतकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

  शिवणी गावाचे पुनर्वसन करण्याचे सुतोवाच

  तालुक्यातील शिवणी गाव पुनर्वसन (Shivani village rehabilitation) करण्यावर आपण भर देण्याचे सूतोवाच केले. परिणामी, पूरपरिस्थितीचा फटका बसलेल्या प्रत्येक गावातील एका प्रतिनिधीकरवी जिल्हाधिकारी यांचे सोबत आपली आपबिती कथन करून जास्तीत जास्त मदतीचा ओघ कसा निर्माण करता येईल, यासाठी मी स्वतः प्रत्यक्षात हजर राहून तातडीची बैठक उद्या बोलावितो. यावेळी पिडीत शेतकऱ्यांचे एका प्रतिनिधींनीला यवतमाळ येण्याच्या सूचना केल्या.