“बागलकोट चौकातील महाराजांचा पुतळा तातडीनं बसवा; कर्नाटकात काँग्रेस सरकारची मुजोरी सहन करणार नाही”; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा, म्हणाले…

कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं मुजोरी करत बागलकोट चौकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री हटवला आहे. हा संपूर्ण हिंदुस्थान आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची ही मुजोरी आम्ही सहन करणार नाही.

    मुंबई – देशाला स्वांतत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरु आहे. कित्येक सरकारं आली आणि गेली पण हा वाद काही थांबायचे नाव घेत नाही. कर्नाटकात मराठी भाषिकांवर सतत होणारे हल्ले, अन्याय यावर अधूनमधून याचे पडसाद उमटत असतात, मात्र आता एका वेगळ्या कारणावरुन कर्नाटक सरकारने आपला महाराष्ट्रावर राग काढला आहे. कर्नाटक सरकारची (Karnatka government) पुन्हा मुजोरी पाहायला मिळत आहे. बागलकोट चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळा हटवण्यात आला आहे. कर्नाटक सरकारनं अंधाऱ्या रात्री शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला. कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबी लावून पुतळा हटवला आला. कर्नाटक सरकारने पुतळा हटवल्याने स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं याचे पडसाद राज्यभरातून उमटत असून, यावर तीव्र प्रतिक्रिया येताहेत. (install Maharaj’s statue in Bagalkot Chowk urgently; Congress government will not tolerate in Karnataka”; Chandrasekhar Bawankule’s warning)

    …अन्यथा काँग्रेसला गंभीर परिणाम भोगावे लागतील

    दरम्यान, यावर महाराष्ट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विट करत कर्नाटक सरकारचा या कृत्याबाबद निषेध व्यक्त केला असून, गर्भित इशारा दिला आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं मुजोरी करत बागलकोट चौकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री हटवला आहे. हा संपूर्ण हिंदुस्थान आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची ही मुजोरी आम्ही सहन करणार नाही. असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. तसेच महापुरुषांचा सातत्यानं अपमान करणं हे काँग्रेसचं धोरण झालं आहे. कर्नाटक सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं स्थापित करावा अन्यथा काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.