मुंबईत १४ स्मशानभूमीमध्ये दहन करण्यासाठी लाकडांऐवजी आता ‘ब्रिकेट्स बायोमास’, पालिकेचा नवीन उपक्रम

पारंपरिक स्मशानभूमीमध्ये प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड हे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मोफत पुरविण्यात येते. हे ३०० किलो लाकूड साधारणपणे २ झाडांपासून मिळते. मात्र, आता पर्यावरणपूरकतेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडाऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली आहे.

    मुंबई : पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने सर्वस्तरिय प्रयत्न करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने विविधस्तरिय कार्यवाही केली जात आहे. याच अंतर्गत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या आदेशांन्वये सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मृतदेह दहनासाठी विविध पर्यायांची चाचपणी करण्यात आली. या चाचपणी-अंती ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ (Agro / Tree Waste Wood) यापासून तयार केलेल्या ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर हा तुलनेने अधिक पर्यावरणपूरक असल्याचे निदर्शनास आले.

    दरम्यान, पारंपरिक स्मशानभूमीमध्ये प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड हे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मोफत पुरविण्यात येते. हे ३०० किलो लाकूड साधारणपणे २ झाडांपासून मिळते. मात्र, आता पर्यावरणपूरकतेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडाऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १४ पारंपरिक स्मशानभूमींमध्ये पर्यावरण पुरकतेचा भाग म्हणून लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पारंपरिक स्मशानभूमीमध्ये लाकडांचा वापर करुन मृतदेहाला अंतिम निरोप देण्यात येतो. यानुसार प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो इतके लाकूड बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पुरविण्यात येते. एवढे लाकूड हे सामान्यपणे २ झाडांपासून मिळते. आता पारंपरिक स्मशानभूमींपैकी १४ स्मशानभूमींमध्ये लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.