गोविंदांना सुरक्षेचे ‘विमा’ कवच; मनसेची चिलखत योजना, तर भाजपकडूनही १० लाख

दहीहंडीदरम्यान काही वेळा दुर्घटनांमध्ये गोविंदा जखमी किंवा मृत्यूमुखी पडतात. अशा वेळी त्यांच्या परिवाराची अवस्था बिकट होते. मात्र, गोविंदांच्या सुरक्षेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर यंदा गोविंदांना विमा सुरक्षाकवच देण्यासाठी मनसे आणि भाजपने पुढाकार घेतला आहे.

    मुंबई : यंदा दहीहंडीसाठी (Dahi Handi) असे निर्बंध नाहीत. तसेच, सरकारने सार्वजनिक सुट्टीदेखील (Government Public Holiday) जाहीर केली आहे. दहीहंडीदरम्यान काही वेळा दुर्घटनांमध्ये गोविंदा जखमी किंवा मृत्यूमुखी पडतात. अशा वेळी त्यांच्या परिवाराची अवस्था बिकट होते. मात्र, गोविंदांच्या सुरक्षेवरदेखील प्रश्नचिन्ह (Quastion Mark On Safety) उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर यंदा गोविंदांना विमा सुरक्षाकवच (Insurance Coverage) देण्यासाठी मनसे (MNS) आणि भाजपने (BJP) पुढाकार घेतला आहे.

    नवी मुंबईतल्या अपघातग्रस्त होणाऱ्या गोविदांना मनसेकडून ‘सुरक्ष कवच’ देऊ केले आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या १ हजार गोविंदांचा १०० कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी गोविंदाच्या अपघाती मृत्यू आल्यास कुटुंबियांना १० लाख रुपये, कायम स्वरुपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, अपघातामुळे रुग्णालयातील खर्च १ लाख रुपये असे विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. या योजनेतील विम्याची मुदत १९ ऑगस्टचा पूर्ण दिवस असणार आहे. ‘सुरक्षा कवच’ योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स येथे जमा करावीत, असे आवाहन मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.

    भाजपकडून गोविंदांसाठी १० लाखांचा विमा
    भाजपकडून देखील गोविंदांसाठी १० लाखांचा विमा कवच देण्यात आले आहे. दहिहंडीत दरवर्षी अनेक गोविंदा आपले अवयव गमवतात, त्यांची काळजी आपणच केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून गोविंदांसाठी १० लाखांचा विमा देण्याचे मुंबई भाजपने जाहीर केले. गोविंदांनी यात सहभाग घ्यावा, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.