Thackeray government's pressure increased; What will the governor decide in the name of the 12 MLAs recommended by the government?

मुंबई : राज्याच्या गुप्तचर विभाग यंत्रणेने एक महत्वाचा अहवाल ठाकरे सरकारच्या हाती सुपूर्द केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचे गुप्तचर विभागाने या अहवालात नमूद केले आहे.

आगामी महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीला मोठं यश मिळू शकते असा अंदाजही या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
विधानपरिषदेप्रमाणेच आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे.

नविन वर्षात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पाच महापालिका आणि तब्बल ९६ नगरपालिकांची निवडणूक होण्याची चिन्हं आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांचाही समावेश आहे.

अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित निवडणुक लढणार असल्याची घोषणा प्रमुख नेत्यांकडून होत आहे. तर, मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, एकत्र निवडणुका लढल्यास मोठं यश मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.