
आशिष देशमुख यांच्यानंतर आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaehb Thorat) यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करणारे पत्र पक्षश्रेष्ठींना लिहिले आहे. त्यामुळं पटोलेविरोधात काँग्रस पक्षातूनच दोन नेत्यांनी लेटर बॉम्ब लिहिल्यामुळं पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद राहणार की जाणार याबाबत राजकीय वर्तुळच चर्चा रंगत आहेत.
मुंबई- विधान परिषद निवडणुकीच्या (MLA Election) निमित्ताने काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नागपूरचे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यानंतर आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaehb Thorat) यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करणारे पत्र पक्षश्रेष्ठींना लिहिले आहे. त्यामुळं पटोलेविरोधात काँग्रस पक्षातूनच दोन नेत्यांनी लेटर बॉम्ब लिहिल्यामुळं पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद राहणार की जाणार याबाबत राजकीय वर्तुळच चर्चा रंगत आहेत.
काय म्हणाले थोरात…?
दरम्यान, राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबेंनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. दरम्यान, या प्रकरणावर आता बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मधल्या काळात खूप राजकारण झालं. मधल्या काळात सत्तांतर झालं त्यावेळी पासून तालुक्यावर सूड उगवला जात आहे. कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे’, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आपली प्रतिक्रिया दिली. संगमनेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
काय म्हटलंय पत्रात…
बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणे शक्य नसल्याचे पत्रात म्हटलं आहे. तसेच आपल्या तालुक्यावर पक्षाकडून अन्याय होत आहे. मुददाम लोकांन डावलले जात आहे. अशी नाराजी पत्रातून व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या नाशिक पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीवरून झालेला घोळ कसा आणि कोणामुळे झाला, हे समोर आणले होते. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस एच. के. पाटील यांनी तांबे कुटुंबातील कोणी निवडणूक लढवायची, याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा, असे सांगितले होते. दरम्यान, थोरातांच्या या पत्रानंतर पक्षश्रेष्ठी कोणत्या निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.