वडूज न्यायालयाच्या आवारात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे निर्देशास अनुसरुन माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांचे मार्गदर्शक तत्वानुसार खटाव तालुका विधी सेवा समिती, वडूज व खटाव तालुका वकिल संघ, वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मंगळवार दि. २१ जून रोजी सकाळी ठिक ७.०० ते ७.४५ चे दरम्यान वडूज न्यायालयाच्या आवारात योग विद्या शिबीर आयोजित करण्यात आले.

    वडूज : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे निर्देशास अनुसरुन माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांचे मार्गदर्शक तत्वानुसार खटाव तालुका विधी सेवा समिती, वडूज व खटाव तालुका वकिल संघ, वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मंगळवार दि. २१ जून रोजी सकाळी ठिक ७.०० ते ७.४५ चे दरम्यान वडूज न्यायालयाच्या आवारात योग विद्या शिबीर आयोजित करण्यात आले.

    सदर कार्यक्रमास ऐंशी वर्षाचे योग विद्या गुरु श्री. भंडारे गुरुजी यांनी वकासन, भद्रासन, शवासन, वज्रासन,वृक्षासन, ध्यान असे अनेक योग प्रकार करून दाखविले व करुन घेतले व रोज सर्वांनी ३० ते ४०मिनिटे योगा केला तर कोणताही आजार होणार नाही असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

    या कार्यक्रमामध्ये माननीय आर. व्ही. हुद्दार, जिल्हा न्यायाधीश-१ वडूज व अध्यक्ष विधी सेवा समिती, वडूज, पी.वाय. काळे, जादा जिल्हा न्यायाधीश, वडूज, डी.डी फुलझेले, दिवाणी न्यायाधीश व स्तर वडूज, एम. सी. नेपत्ते, सह दिवाणी न्यायाधीश व स्तर वडूज, एस. आर.गुळवे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर वडूज, जी. एम. निमदेव,  सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर वडूज व  व्ही. बी. शितोळे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, वडूज हजर होते. तसेच  एन.एम. गोडसे, अध्यक्ष, वडूज वकील संघ व विधीज्ञ, कर्मचारी वृंद हजर होते. आभार प्रदर्शन अॅड. एस.एस. भोसले यांनी केले. यावेळी वडूज न्यायालयातील कर्मचारी वर्ग सुध्दा उपस्थित होते.