
मुंबई उच्च न्यायालयातील न्या. एन. डब्ल्यू. सांबरे आणि न्या. आर. एन.लड्ढा यांच्या नेतृत्वाखालील कोर्ट रुमनंबर ३४ येथे न्यायालयीन कामकाज नियमित सुरू असताना अचानक एका मांजरीमुळे अडथळा निर्माण झाला. मांजराला बाहेर नेण्यासाठी शिरस्तेदारांनी प्रयत्न केला. परंतु त्यांच्या हाताला मांजर लागले नाही.
मयुर फडके, मुंबई : उच्च न्यायालयाचे कामकाज (High Court Work) हे नेहमीच कोणत्याही गोंगाटाविना आणि शांततेत (In Pindrop Silence) पार पडते. न्यायदालनात मोबाईल फोनचा आवाज (Mobile Phone Voice) झाल्यावरही संबंधित व्यक्तिला ताकीद दिली जाते. अशातच माणसांना लागू असणारे हे नियम (Rules) साफ धुडकावून एक चार पायांचा व्यत्यय (Interruption) न्यायालयातील सुनावणीदरम्यान उपस्थित झाला. हा व्यत्यय होता उच्च न्यायालयात बिनधास्त वावरणाऱ्या मांजरीचा (Cats Presence) . त्यातूनच न्यायालयाने त्यांच्या मांजरीबाबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आणि न्यायालयाच्याच एका आदेशामुळे प्राण्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याचे लक्षात येताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
मुंबई उच्च न्यायालयातील न्या. एन. डब्ल्यू. सांबरे आणि न्या. आर. एन.लड्ढा यांच्या नेतृत्वाखालील कोर्ट रुमनंबर ३४ येथे न्यायालयीन कामकाज नियमित सुरू असताना अचानक एका मांजरीमुळे अडथळा निर्माण झाला. मांजराला बाहेर नेण्यासाठी शिरस्तेदारांनी प्रयत्न केला. परंतु त्यांच्या हाताला मांजर लागले नाही. एका महिला वकिलाने अखरे त्या मांजराला पकडले आणि शिरस्तेदारांनी मांजराला बाहेर नेले. या प्रसंगानंतर भटके कुत्रे आणि मांजरासंबंधित किस्से न्यायालयात रंगले.
न्यायालयाच्या आदेशामुळेच हात बांधलेले
यावेळी न्या. सांबरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बाजू मांडणाऱ्या अँड. अनिल साखरे यांच्यासोबत झालेल्या मांजरीसंदर्भातील संभाषणाच्या आठवणींना उजाळा दिला. न्यायालयातील भटक्या कुत्र्यांसह मांजरीच्या हैदोसावर कारवाई करण्याबाबत साखरेंना विचारणा केली. तेव्हा, न्यायालयाच्या (न्या. सांबरेच्याच) एका आदेशामुळे पालिकेचे हात बांधले गेल्याची माहिती अँड. साखरे यांना दिली. त्या आदेशानुसार, प्राण्यांची नसबंदी अथवा उपचार केल्यानंतर त्यांना मुळ ठिकाणी (ज्या जागेवरुन उचलेले आहे) तिथेच सोडण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे. या नियमानुसार, न्यायालयातील मांजर अथवा कुत्र्यांना उपचार अथवा नसबंदी करण्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा तिथेच (न्यायालयातच) आणून सोडावे लागेल. या संभाषणानंतर न्यायालयातील उपस्थितांमध्ये खसखस पिकली.
न्या. शिंदे यांनी केली मांजरांशी मैत्री
उच्च न्यायालयात दीर्घकाळ न्यायमूर्तीपद भूषवणारे न्या. एस. एस. शिंदे यांनीही या प्रश्नी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, अखेर त्यांनीच मांजरांशी मैत्री केली. ही मैत्री इतकी घनिष्ठ होती की मांजरी सुनावणीदरम्यान त्यांच्यासमोर येऊन बसत असत, अशी आठवणही याप्रसंगी न्या. सांबरे यांनी करून दिली.