राजेंद्र राऊत यांच्या कुटुंबियांसह मित्र परिवाराच्या 700 कोटींची चौकशी करा; शिंदे गटाच्या नेत्याची मागणी

राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना देवेंद्र फडणवीसांच्या (Dy CM Devendra Fadnavis) मर्जीतील अपक्ष आमदाराचे टेंशन शिंदे गटाच्या नेत्याने वाढवले आहे. बार्शीचे अपक्ष आणि भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बार्शी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी गंभीर आरोप केले आहेत.

    सोलापूर : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना देवेंद्र फडणवीसांच्या (Dy CM Devendra Fadnavis) मर्जीतील अपक्ष आमदाराचे टेंशन शिंदे गटाच्या नेत्याने वाढवले आहे. बार्शीचे अपक्ष आणि भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बार्शी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी गंभीर आरोप केले आहेत.

    राजेंद्र राऊत यांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्र परिवाराची 700 कोटी रुपयांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात शिंदे गटाच्या भाऊसाहेब आंधळकरांनी जाहीर पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. बार्शी मतदारसंघात 2019 साली निवडून आलेले बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी भाऊसाहेबांनी केली आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागामार्फत ही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    1995 साली राजेंद्र राऊत यांच्याकडे एक दुचाकी वाहन आणि सात एकर शेतजमीन होती. आज मात्र राजेंद्र राऊत यांच्याकडे शेकडो एकर शेतजमीन आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. राजेंद्र राऊत हे स्वतः लोकसेवक असल्याने त्यांना अँटी करप्शन कायदा लागू आहे. त्या अनुषंगाने सीबीआय, अँटी करप्शन, इन्कम टॅक्स अशा विविध 17 शासकीय यंत्रणाकडे भाऊसाहेबांनी तक्रार केली आहे.