‘त्या’ बालकाच्या मृत्यूची चाैकशी करा ; पालकमंत्री दादा भुसे यांचे आदेश

त्र्यंबकेश्वर येथील आधाराश्रमात ४ वर्षीय मुलाच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणाची जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी या बालकाच्या हत्येच्या सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यलयात बैठकीनंतर पत्रकार परिषदेत भुसे बोलत होते. मालेगावात काही लहान बालकांना गोवरचे डोस दिले नसल्याचे समोर आले.

  नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील आधाराश्रमात ४ वर्षीय मुलाच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणाची जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी या बालकाच्या हत्येच्या सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यलयात बैठकीनंतर पत्रकार परिषदेत भुसे बोलत होते. मालेगावात काही लहान बालकांना गोवरचे डोस दिले नसल्याचे समोर आले. त्यामुळे लसीकरण करण्याचे आदेश दिले. तसेच मालेगावात लसीकरण बाबत जनजागृती केली जाणार आहे. यासाठी या मोहिमेत काही धार्मिक गुरूंनाही सहभागी करून घेणार आहोत. विदर्भ, मराठवाडा वेगळे कुणाच्या मनात असेल असे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच खूप कष्टाने आपण महाराष्ट्र मिळवला यासाठी १०५ हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. शिंदे गटात कुठेही मतभेद नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आ. कांदे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी हे विधान केले. खा. संजय राऊत यांनी केलेल्या कालपर्यंत आम्ही होतो, तेव्हा खूप चांगले होतो आणि आज अचानक वाईट झालो. आम्ही आहोत तसेच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  गाेवर लसीकरण करावे
  जिल्हा शासकीय रुग्णालयात साधारणपणे ४ मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. साधारणपण १० मृतदेह ठेवण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे असुविधा निर्माण होऊ शकते. आणखी मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. गोवरबाबत सध्या चिंता करण्याची गरज नाही, गोवरचे संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गोवरप्रकरणी शहरात स्वतंत्र कक्षाची देखील निर्मिती करण्यात आली आहे. पालकांनी लहान बालकांना लसीकरण करून घ्यावे.

  शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करणार नाही
  तीन वर्षात ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलेले आहे, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर ५० हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना शासनाकडून आणली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास वीज मिळावी यासाठी नियोजन आहे. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांनी वीज बिल भरण्याची विनंती त्यांनी केली आहे. यासंह ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही, त्यांची वीज न तोडण्याचे आदेश दिले.

  खड्डे बुजविण्यासाठी १५ डिसेंबरचा अल्टीमेटम
  शहरातील खड्डे बुजावण्यासाठी पालकमंत्री भुसे यांनी आता १५ डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. यापूर्वी रस्ते बुजवण्यासाठी ३० नोव्हेबरची मुदत पालकमंत्र्यानी दिली होती. दरम्यान -तीन वर्ष रस्ता दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असून संबंधित ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्ती करून घेणे बंधनकारक असल्याचे भुसे यांनी म्हटले.

  मुख्यमंत्री पूजेसाठी गेले हाेते…
  मुख्यमंत्री पूजेला गेले होते होते हात दाखविण्याचा कुठलाही प्रकार झालेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर असताना अचानक त्यांनी ताफा सिन्नरकडे वळवला. त्यानंतर सिन्नरजवळील ईशान्येश्वर मंदिरात त्यांनी भेट दिली. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल शिर्डीला गेले होते. यावेळी त्यांनी सपत्नीक साई मंदिरात पाद्यपूजा केली. तसंच त्यांच्या हस्ते आरती देखील झाली. शिर्डीहून मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक सिन्नरकडे वळला. सिन्नर तालुक्यातील श्री ईशान्येश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. त्याचबरोबर सपत्नीक पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. या भेटीनंतर चर्चाना उधाण आले आहे. यावर बोलताना मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री पूजेला गेले होते, हात दाखविण्याचा कुठलाही प्रकार झालेला नसल्याचे ते म्हणाले. शिर्डीहून मुख्यमंत्री हे सिन्नर येथील ईशान्येश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. या ठिकाणी पूजा केल्यानंतर ते माघारी फिरले. त्यामुळे हात दाखविण्याचा प्रकार झालेला नाही.