“पत्रकारांवरील धाडी व कारवाया…, सरकार घाबरले आहे! तपास यंत्रणा स्वायत्त की सरकारच्या गुलाम…”; सामनातून केंद्र सरकारवर टिकास्त्र

‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांना सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे की, ‘‘निष्पक्ष रहा, सूडाने कारवाया करू नका.’’ यातच सर्व आले. पत्रकारांवरील धाडी व कारवाया हे यंत्रणा निष्पक्ष असल्याचे लक्षण नसून सरकार घाबरले असल्याचे लक्षण आहे!, असं सामनातून टीकास्त्र करण्यात आले आहे.

    मुंबई – काल दिल्लीत काही पत्रकारांवर तपास यंत्रणानी कारवाई केली आहे. यावर आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेलं सामना या वृत्तपत्रातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करावा ही काही लोकशाही नाही. केंद्र सरकारने पत्रकारांवरील कारवाईचे समर्थन केले. तसे असेल तर भाजपने आणीबाणीचा निषेध करणे सोडले पाहिजे. तपास यंत्रणा स्वायत्त आणि स्वतंत्र असून आपले कायदेशीर कर्तव्य बजावीत आहेत, असे केंद्रीय प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर म्हणतात. तपास यंत्रणा स्वायत्त की सरकारच्या गुलाम हे संपूर्ण देश जाणतोय. ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांना सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे की, ‘‘निष्पक्ष रहा, सूडाने कारवाया करू नका.’’ यातच सर्व आले. पत्रकारांवरील धाडी व कारवाया हे यंत्रणा निष्पक्ष असल्याचे लक्षण नसून सरकार घाबरले असल्याचे लक्षण आहे!, असं सामनातून टीकास्त्र करण्यात आले आहे. (investigative system autonomous or slave of the government criticism of central government from saamana)

    सरकारविरुद्ध लिहिणे-बोलणे हा देशद्रोह

    देशातील सर्व माध्यमांचा ताबा भाजपापुरस्कृत उद्योगपतींनी घेतला आहे. त्यामुळे सर्व एकतर्फी पद्धतीने सुरू आहे. चार दिवसांपूर्वी मोदी सरकारविरोधात दिल्ली व आसपासच्या प्रदेशांतून लाखोंच्या संख्येने लोक जमले. रामलीला मैदानावर जनसागर उसळला, पण या जनसागराचे म्हणणे काय? ते काही भाजपाची चमचेगिरी करणाऱ्या मीडियाने दाखवले नाही. अशा ‘गोदी’ मीडियाला समांतर असा बाणेदार मीडिया समाजमाध्यमातून उभा राहिला. त्यास लोकांनी पाठिंबा दिला तेव्हा सरकारला मिरच्या झोंबल्या,” अशी टीका ठाकरे गटाने केली. तसेच कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांच्या घरीही पोलीस पोहोचले. येचुरी यांचे स्वीय सहाय्यक नारायणन यांचे चिरंजीव सुमित ‘न्यूज क्लिक’मध्ये कामाला आहेत. त्यामुळे येचुरी यांच्या घरावर छापे पडले. आणीबाणीत व्यक्तिस्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी झाली, असे बोंबलणाऱ्यांच्या राज्यात वृत्तपत्र स्वातंत्र्य वधस्तंभावर चढवले असेच म्हणावे लागेल. आणीबाणीत सेन्सॉरशिप होती. आता सरकारविरुद्ध लिहिणे-बोलणे हा देशद्रोह, दहशतवादासारखा गुन्हा ठरला आहे. असं सामनातून म्हटलं आहे.

    मंगळवारी मध्यरात्री २ वाजल्यापासून या धाडी सुरू झाल्या. दहशतवाद्यांच्या अड्ड्यात घुसून ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करावे तशा पद्धतीने पोलिसांची पथके पत्रकारांच्या घरात घुसली. लेखिका गीता हरिहरन, अभिसार शर्मा, भाषा सिंह, उर्मिलेश, अनिंदो चक्रवर्ती, इतिहासकार सोहेल हाशमी, व्यंगचित्रकार संजय राजौरा, इरफान खान, स्तंभलेखिका अनुराधा रमन, सत्यम तिवारी अशा अनेक पत्रकारांवर छापे टाकून त्यांचे फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त केले, अशी टीका सामनातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.

    “पंतप्रधान मोदी व त्यांच्या भाजपाविरुद्ध बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांवर मंगळवारी दिल्ली येथे धाडी पडल्या. ‘न्यूज क्लिक’ या वृत्त संकेतस्थळाचे संस्थापक संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना तर अटक केली गेली. चीनधार्जिणा दुप्रचार चालविण्यासाठी बेकायदा आर्थिक मदत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर असून ‘यूएपीए’ म्हणजे बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.