
विरोधात लिहू नये म्हणून पत्रकारांना चहाला बोलवा असे बावनकुळे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपा व बावनकुळेंवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई – “पत्रकार आपल्या विरोधात बोलू नये किंवा लिहू नये म्हणून त्यांना चहाला बोलवा, जेवणासाठी धाब्यावर न्या”. ह्या प्रकारची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. विरोधात लिहू नये म्हणून पत्रकारांना चहाला बोलवा असे बावनकुळे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपा व बावनकुळेंवर हल्लाबोल केला आहे. (Invite journalists to tea so they don’t write against”, opposition aggressor on alleged audio of Bawankule, said)
काय म्हणाले नाना पटोले?
सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपवरून नाना पटोले यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये निवडणूकीच्या काळात आपल्या विरोधात बातम्या छापल्या जावू नये यासाठी पत्रकारांना चहा पाजण्याबद्दल किंवा धाब्यावर जेवणासाठी ते कार्यकर्त्यांना सूचना देत असल्याचे संभाषण आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधना आहे. “चंद्रशेखर बावनकुळेंची यावरुन विद्वत्ता दिसून येत आहे. अशी टिका पटोले यांनी केली आहे.
मी फक्त चांगले वागण्याचा सल्ला दिला
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने विरोधकांकडून त्यांची कोंडी करण्यात येत आहे. तसेच यावर टीका होत असताना, आता यावर स्वत: चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “मी फक्त पत्रकारांशी चांगले वागा, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला दिला असं बावनकुळे म्हणाले”