संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

ग्राम एरंडा येथे भरवस्तीत असलेल्या मंदिरासमोर शेतीच्या वादातून एकाची लोखंडी रॉडने वार करून हत्या (Murder in Malegaon) करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.11) रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली. गजानन उत्तम सपाटे (वय 45) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    मालेगाव : ग्राम एरंडा येथे भरवस्तीत असलेल्या मंदिरासमोर शेतीच्या वादातून एकाची लोखंडी रॉडने वार करून हत्या (Murder in Malegaon) करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.11) रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली. गजानन उत्तम सपाटे (वय 45) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    फिर्यादी शिवाजी उत्तम सपाटे (वय 41, रा. एरंडा) यांनी पोलिसांत फिर्यादी दिली. फिर्यादीचा गजानन उत्तम सपाटे हा मोठा भाऊ असून, ते दोघे वेगळे राहतात. गजानन हा आई-वडिलांसह राहतो. भाऊ गजानन हा वडिलांना सांभाळत असल्याने वडिलांचे नावावर कारली शेतशिवारात असलेली गट क्रमांक 314 असलेली 14 एकर 20 गुंठे ही शेती भाऊ गजानन वाहतात. त्या जमिनीचा कारली येथील नारायण सखाराम डुकरे, मधुकर सखाराम डुकरे, किसन सखाराम डुकरे, नर्मदाबाई सखाराम डुकरे, यांच्यासोबत दिवाणी स्वरूपाचा वाद कोर्टात सुरू आहे.

    बुधवारी रात्री गजानन सपाटे कारली शेत शिवारातील सोयाबीन सोंगून आणत होता. त्या सोयाबीनचे कट्टे गावातील हनुमान मंदिराच्या पारावर ठेवली. त्यावेळी फिर्यादी ते सोयाबीन पाहण्याकरिता जात असताना त्यांच्या पाठीमागे वहिनी चित्रा गजानन सपाटे या सुद्धा आल्या होत्या. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता घडला प्रकार समोर आला.