नागठाने परीसर गांजा लागवडीसाठी योग्य? तीन वेगवेगळ्या कारवाईतून स्पष्ट ; तरूणाई अडकली व्यसनाच्या विळख्यात

गेल्या काही दिवसात बोरगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध गांजा उत्पादन व विक्रेते यांच्यावर झालेल्या कारवाईत सर्वात स्थानिक गुन्हे अन्वेषणने २७ लाख ३४ हजाराची मोठी कारवाई करून बोरगाव पोलीसांना 'चेकमेंट'च केल्याची चर्चा सुरू होती या कारवाईने बोरगाव पोलीसांच्यावर झालेली नामुष्कीने प्रभारीची झोप उडाली.

    नितिन साळुंखे, नागठाणे : चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.या आर्थिक संकटातून कसे बाहेर पडायचे या विवंचनेत असताना, सातारा तालुक्यातील बोरगांव पोलीसठाण्याअंतर्गत अवैध गांजा लागवड व विक्रेता यांच्यावर झालेल्या तीन ठिकांणच्या विविध कारवाईतून हे स्पष्ट झाले आहे की, बोरगांव पोलीस स्टेशनचा परीसर हा अवैध व्यवसायासाठी प्रसिद्ध होत आहे काय ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.

    गेल्या काही दिवसात बोरगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध गांजा उत्पादन व विक्रेते यांच्यावर झालेल्या कारवाईत सर्वात स्थानिक गुन्हे अन्वेषणने २७ लाख ३४ हजाराची मोठी कारवाई करून बोरगाव पोलीसांना ‘चेकमेंट’च केल्याची चर्चा सुरू होती या कारवाईने बोरगाव पोलीसांच्यावर झालेली नामुष्कीने प्रभारीची झोप उडाली. या कारवाईची धास्ती घेऊन सैरभैर झालेल्या बोरगाव पोलीसांनी कुसवडे ता.सातारा येथील गांजा उत्पादकांवर कारवाई करत १ लाख रूपयांच्या किंमतीची गांजाची झाडे जप्त केली.

    या कारवाईच्याआधारे नागठाणे ता.सातारा सराईत गांजा विक्रेता मोहीते यांच्यावर कारवाई करत १ लाख रूपये किंमतीचा गांजा जप्त केला. या तीन वेगवेगळ्या झालेल्या कारवाईतून बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत “पोलीसांच्या आशिर्वादाने” अवैध गांजा उत्पादन व विक्री जोमात सुरू असल्याची चर्चा परिसरात होत आहे.

    तरूणाई अडकली गांजाच्या विळख्यात
    परिसरात असणाऱ्या या अवैध गांजाविक्रीने येथील तरूणाईपूर्ती गांजाच्या धूरांड्यात अडकली आहे यामध्ये प्रामुख्याने काँलेज तरुण मोठ्या प्रमाणात सहभाग आढळून येत आहे. नागठाणे परीसर हा शैक्षणिक दृष्ट्या नावारुपास येत असताना अवैध व्यवसायाने शैक्षणिक दृष्ट्या महत्व कमी होत आहे.

    ब़ोरगाव पोलिसांचे दुर्लक्ष
    गांजा विक्रीबरोबरच अन्य अवैध व्यवसाय ही मोठ्या जोमात सुरु असून पोलीसांच्या दुर्लक्षामुळे व्यवसायिकांना बळ मिळत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी यावर वेळीच आवर घालावा अशी मागणी जनतेतुन होत आहे.